Home मराठवाडा घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू...

घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना…!

350

रब्बी हंगामातील पिकांचे वन्यप्राण्यांकडून प्रचंड नुकसान,रानडुक्करं,कोल्हे, हरणांचे मोठे कळप

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ महसूल मंडळात वन्य प्राण्यांचा हैदोस

परतीच्या पावसाने सोयाबीन , कापूस, मोसंबी, डाळींब , सीताफळ आदी खरीप हंगामातील पिकांची वाट लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.
रब्बी हंगामात पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने सिताफळ, मोसंबी ही फळपिके जोरात डोलताना दिसून येत आहेत. परंतु वन्यप्राणी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत ,त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
बळीराजाला कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना अनेक वेळा करावा लागलेला आहे. त्यातच यंदाचा परतीचा पाऊस, एखादेवेळी निसर्गाने साथ दिली तर पिकविलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही त्यामुळे सतत आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अतिरिक्त पावसामुळे खरिप गेले असले तरी शेतकरी रब्बी पिकांच्या आशेवर जगत आहे.अतिरिक्त पावसामुळे पाणी परिस्थिती उत्तम आहे.त्यामुळे रब्बीचे पिक जोमदार आले आहे परिसरात शेतकरी समाधानी दिसत होता परंतु वन्यप्राण्यांमुळे वैतागून गेला आहे घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था म्हणजे आई जेवू घालीना ,बाप भिक मागू देईना अशी झाली आहे.हाता तोंडाशी आलेला घास रानडुकरं, रुई , हरीणाचे कळप फस्त करत आहेत. वन्यप्राणांनी पिकांची नासाडी केली आहे. त्यामुळे पुन्हा बळीराजा शेतकरी संकटात सापडला आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, बाजरी व कपाशी ही पिके अतिवृष्टीमुळे हातची गेली त्यामुळे सर्व भिस्त रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहे परंतु एकीकडे जोमात आलेले पिकं वन्यप्राणी फस्त करत आहेत त्यांचा वनविभागाने बंदोबस्त करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकाऱ्यांतून होत आहे.