घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना – महाराष्ट्राची अध्यात्मिक भिंत राष्ट्रसंत, जगद्गुरु तुकाराम महाराज यांची बिज साजरी करण्याची पिढीजात परंपरा जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील प्रकाश प्रभाकरराव कंटुले यांनी जोपासली आहे.येथील श्रीविठ्ठल रूख्माई मंदिरात तुकोबारायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कोरोना महामारिच्या काळात नियमांचे पालन करत भजन करण्यात आले आज मंगळवारी,३० मार्च रोजी दुपारनंतर अन्नदान करण्यात आले . गावातील नागरिक, व्यापारी, वारकरी यांनी प्रसादाचा लाभ घेतला.प्रकाश कंटुले यांनी संत तुकाराम महाराज यांची बिज साजरी करण्याची पिढीजात परंपरा पुढे चालू ठेवली आहे.मागील पिढींनी दुष्काळ परिस्थिती मध्ये देखील भाजी -भाकरी,वरण -भाकरी बनवून लोकांना जेवू घातले आणि आत्मा तृप्त केला परंतु बिज साजरी करण्याच्या परंपरेत खंड पडू दिला नाही.
हे पण वाचा
२२ जानेवारी १६०८ रोजी सामान्य घराण्यात संत तुकाराम महाराज यांनी जन्म घेतला.प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे तुकोबांनी सहन केले,विपत्तीच्या काळातही भंडारा डोंगरावर श्री विठ्ठलाची उपासना केली सर्व समाज श्रीमंत असावा असा स्थायीभाव ठेवला ह्रदयात गरिबांविषयी कळकळ होती.कर्जदारांचे कर्ज माफ करणारे एकमेव संत.लौकिक मायाजाळात न गुरफटणारे संत.संसारात राहूनही आयुष्य परमार्थाकडे नेणारे संत.तुकोबांनी अभंगांची भाषा सोपी,सरळ बनवली समाजातील दांभिक वृत्तीवर , भोळ्या समजुतीवर आसुड ओढले.निर्भिड संत,साक्षात्कारी सत्पुरूष असुनही समाजाला ईश्वरिय भक्तीचा सोपा मार्ग दाखविला.संसारातील विरक्तीचा महामेरू जोपासला.वारकरी संप्रदायाची परंपरा निर्माण केली.वेदांत साध्या सोप्या भाषेत जनसामान्यात नेले.स्वराज्य निर्मितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मार्गदर्शक,गुरु म्हणून समाजात अभिमानाने उल्लेख केला जात आहे. संत तुकाराम महाराजांना भागवत धर्माचा कळस म्हणून भाग्य लाभले आहे.