यवतमाळ / पुसद , प्रतिनिधी – हिंदवी स्वराज्याचे निर्माते कुळवाडी भूषण छत्रपति शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती शिवसेना कार्यालय पापींनवार बिल्डिंग नवीन पुसद येथे कोविड करोना चे नियम पाळून साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम विश्वंभर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले तर ॲड उमाकांत पापिंनवार सभापती पाणी पुरवठा यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सध्या कोविड करोना चे संकट संपूर्ण महाराष्ट्रा वर असल्याने व पुसद शहरात रुग्णाची संख्या वाढत असल्याने सोशल डीस्टन चे पालन करून शिव जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी शिवपूजन करण्या करता रवी पांडे मोहन विश्वकर्मा संतोष दरणे दीपक उखळकर अजू चिदरवार गणेश खटकाळे संदीप लाभषेटवार गोलू चापके राजू महाजन संजय जोगदंड यांचे सह खुपिया विभागाचे दिलीप जाधव पोहेका नंदू चौधरी उपस्थित होते असे समजते