Home विदर्भ 10 मृत्युसह जिल्ह्यात 441 जण पॉझेटिव्ह  तर‌ 351 जण कोरोनामुक्त

10 मृत्युसह जिल्ह्यात 441 जण पॉझेटिव्ह  तर‌ 351 जण कोरोनामुक्त

683

    यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 10 मृत्युसह 441 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 351 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 57 व 58 वर्षीय पुरुष आणि 43 व 74 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 50 व 60 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 45 वर्षीय महिला, उमरखेड येथील 73 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 40 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.31) पॉझेटिव्ह आलेल्या 441 जणांमध्ये 276 पुरुष आणि 165 महिला आहेत. यात यवतमाळातील 163, पुसद 68,  उमरखेड 41, वणी 27, दिग्रस 25, दारव्हा 21,  आर्णि 18, महागाव 14, घाटंजी 13, नेर 11, पांढरकवडा 9, झरीजामणी 8, मारेगाव 7, कळंब 6, बाभुळगाव 2, राळेगाव 1 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

            बुधवारी एकूण 4098 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 441 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3657 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2489 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1135 तर गृह विलगीकरणात 1354 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 28577 झाली आहे. 24 तासात 351 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25433 आहे. तर जिल्ह्यात एकूण 655 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 269151 नमुने पाठविले असून यापैकी 262039 प्राप्त तर 7112 अप्राप्त आहेत. तसेच 233462 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.