Home नांदेड हरडप येथे सिंदखेड पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड…..!

हरडप येथे सिंदखेड पोलिसांची गावठी दारू अड्ड्यावर धाड…..!

315

मजहर शेख,

नांदेड/माहूर,दि : ३१:- माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत हरडप येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतात सिंदखेड पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकली आहे.
यामध्ये हरडप शिवारात इसम नामे
गणेश पाटील राहणार हरडफ ता.माहुर याच्या ताब्यातून दिनाक 29 मार्च रोजी यातील आरोपीने मौजे हरडप शिवारात प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतात दोन प्लास्टिकच्या 05 लिटरच्या कॅनमध्ये दहा लिटर गावठी हातभट्टी दारू अंदाजे 500 रुपयाची मोक्यावर नष्ट करण्यात आली. इसमावर गुन्हा दाखल करून.धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कार्यवाही करण्यात आली.सदर कार्यवाही सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके,पोलीस जमादार हकीम पठाण,फुलारी,सानप यांनी केले.