Home मराठवाडा कोरोना महामारिचा दणका! आठवडी बाजारात सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची फरपट….

कोरोना महामारिचा दणका! आठवडी बाजारात सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची फरपट….

406

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

आठवडी बाजार म्हणजे हप्ताभराची गोळाबेरीजच , मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या गोरगरिबांची जत्रा म्हणायला हरकत नाही.

बाजाराहून परतलेल्या बाई,बापड्याने बाजाराचे गाठोडे सोडले कि ,शेवचिवडा, फुटाणे,रताळी,गाजर,काकडी … मिळविण्यासाठी घरातील पोरं तुटून पडतात…हे दृष्यच मुळात उर भरून येणार असायचं मात्र कोरोना महामारिने सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळविले.आठवडी बाजारात भाजी पाल्याचे गाठोडे विक्रीसाठी घेऊन आलेला शेतकरी किंवा व्यापारी कावऱ्याबावऱ्या नजरेने सभोवताली बघतो आणि भितभितच गाठोडे विक्रीसाठी सोडतो… बाजारात खरेदीसाठी आलेले गोरगरिब,हातावर पोट भरणारे लोक पोलिस गाडीचा सायरण वाजताच सैरावैरा पळायला लागतात व्यापारी, शेतकरी बाजाराचे गाठोडे गुंडाळून पळतात … बुधवारी तर कमालच झाली.. पोलिसांच्या गाडीसोबत कचरागाडी पण होती शेतकऱ्यांनी हाडाची काडं करून पिकविलेला भाजीपाला बाजारातून उचलायचा आणि कचराकुंडीत टाकायचा .. भयानक परिस्थिती आहे..बाजारू, व्यापारी आणि शेतकरी यांची फरपट होण्यास कोरोना सोबतच प्रशासनही जबाबदार मानले जात आहे.एकिकडे नियम सिथिल करायचे आणि लोक रस्त्यावर आले कि आम्ही किती कर्तृत्वदक्ष आहोत हे दाखवण्यासाठी दंडुका घेऊन मागे लागायचे ? ह्या गोष्टी लोकांच्या पचनी पडायला तयार नाहीत. आठवडी बाजार बंद तर बंदच ठेवाना , लोकांनी मास्क वापरायचे तर विनामास्क वाल्यांवर कारवाई कराना, जेवायला बसवून ताटावरून उठवायचा उद्योग बंद झाला पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्त करत प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला.कोरोना महामारिच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने नियम सिथिल केल्यामुळे घनसावंगी, कुंभार पिंपळगाव,तीर्थपुरी,सुखापुरी, अंतरवाली टेंभी,पारडगाव,रांजनी येथील आठवडी बाजारात सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची फरपट होत आहे.