घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
मंगळवारी,३० मार्च रोजी घनसावंगी येथे प्रहार संघटनेची बैठक पार पडली, या बैठकीत एकमताने अनिरूद्ध म्हस्के यांची जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात अली. मागील तीन वर्षातील घनसावंगी तालुक्याचे काम बघून बचुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण यानी ह्या नियुक्त्या केल्या . तसेच प्रहार संघटना घनसावंगी तालुका अध्यक्षपदी विष्णु मीठे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अंगद नागरे यांची निवड करण्यात आली या सर्वांना बचुभाऊ कडू यांचे पी ए ( स्वीय सहाय्यक ) श्री संतोष राजगुरू सर यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. त्या अगोदर राजगुरू सर यांची बचुभाऊ कडू शालेय शिक्षण खात्याचे पी ए ( स्वीय सहाय्यक ) म्हणून निवड झाल्याबदल प्रहारच्या सर्व टीम ने राजगुरु सराचे स्वागत केले.यावेळी संतोष राजगुरु सर,जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण , अनिरुध म्हस्के,विष्णु मीठे,अंगद नागरे,परमेश्वर जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.