Home पश्चिम महाराष्ट्र चिमुकल्यांचा अभिरूप बाजार ही स्तुत्य कल्पना डॉक्टर दिलीपराव येळगावकर

चिमुकल्यांचा अभिरूप बाजार ही स्तुत्य कल्पना डॉक्टर दिलीपराव येळगावकर

303

मायणी – सतीश

डोंगरे सातारा , दि. १८ :- जास्त गुण दहावी-बारावीला मिळाले व मिळवले विद्यार्थी हुशार समाजात मानला जातो पण ही भ्रमण कल्पना आहे दहावी नापास सचिन तेंडुलकर वयाच्या अठराव्या वर्षी कसोटी सामन्यात खेळतो अथवा लेखक रणजित देसाई वयाच्या बाराव्या वर्षी हातात लेखणी घेतात मुलांना शिक्षण शाळे बरोबर समाज मिळणे गरजेचे आहे समाजात कसे राहावे कसे बोलावे हे आपले व्यवहार ज्ञान कसे अद्यावत ठेवावे यासाठी अभिरूप बाजाराची गरज असल्याचे मत डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी येथे चिमुकल्यांच्या अभिरुप बाजार प्रसंगी बोलताना व्यक्त केले .

मायणी येथील भगतसिंग विद्यामंदिर व अनंत इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता पहिली ते नववी विद्यार्थ्यांनी अभिरूप बाजार भरवला होता या बाजारात विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातून भाजी फळभाजी पेरू रताळी गाजरे बीट या वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या तसेच काही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तयार केली होती बाजारात आलेल्या ग्राहकांनी भेळीचा आस्वाद घेतला तसेच बाजारात 10 ते 15 हजाराचे उलाढाल झाली हा अभिरूप बाजार भरवण्यासाठी संचालक राजाराम कचरे, ग्रामपंचायत सदस्य विजय कवडे ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके, उपसरपंच आनंदा शेवाळे, उपस्थित होते.

मुख्याध्यापक सुनील यलमर, दीपक खलिपे,आकबर शेख,जमादार मॅडम, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले या बाजाराची वैशिष्ट्ये म्हणजे या बाजारात खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांनी सपत्नीक बाजार खरेदीचा आनंद घेतला व विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कसे आहे कसे चालते याचा अभ्यास दिला यामुळे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या आनंदाचे वातावरण होते आणि एक वेगळेपण होते विशेष म्हणजे पौर्णिमा असल्यामुळे सरुताई मठाच्या पावन भूमीवर हा बाजार भरला होता या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांनी बाजार करण्याचा आनंद घेतला या बाजार करण्यासाठी सौ उर्मिला येळगावकर मॅडम,देवस्थान ट्रस्ट चे सचिव रवींद्र बाबर, चन्ने मॅडम ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी नितीन झोडगे व गावातील ग्रामस्थ यांनी आनंद घेतला.