Home मराठवाडा साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी सुधाकर चिमणे यांचे निधन

साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी सुधाकर चिमणे यांचे निधन

1025

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी सुधाकर शंकरराव चिमणे यांचे बुधवारी दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी रात्री ९.२० वाजता निधन झाले. गुरूवारी दिनांक १एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता त्यांचा अंत्यविधी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे प्रांगणात करण्यात येणार आहे. कोरोनाचे प्रादुर्भावामुळे मास्क लावून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कमीत कमी संख्येत होणार आहे.