Home रायगड 10 वी नापास भामटयाने पोलीस अधिकारी , वकील यांना लावला चुना..

10 वी नापास भामटयाने पोलीस अधिकारी , वकील यांना लावला चुना..

315

गिरीश भोपी 

रायगड / पनवेल – खारघर पोलीस ठाणे येथे गु रजि नं. 115/2021 भादवि कलम 420,406,465,4़67,468,471,477 अ, 409,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयामध्ये पोलीस फिर्यादी असुन, आरोपी सचिन गुंडेराव पवार याने सिडको कडुन मिळालेल्या भंुखडामध्ये फ्लॅट देतो म्हणुन ब-याच नवी मुंबई पोलीस कर्मचारी यांना चुना/फसवणुक केली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सचिन पवार याने सोसायटीच्या खात्यामधुन खातेधारकाच्या खोटया सहया करून विजया बॅकेचे बॅक मॅनेजर यांचे मदतीने सोसायटी मधील भुखंडासाठी जमा केलेली दिड कोटी पेक्षा अधिक रक्कम पत्नी, मेहुणा, दाजी यांचे खात्यामध्ये वळते केले असल्याचे निषपन्न झाले आहे. सदर गुन्हा पोलीस उप आयुक्त साो, पनवेल शिवराज पाटील यांच्या आदेशान्वये वरीष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल अजय कुमार लांडगे, व सहा पोलीस निरीक्षक काळसेकर यांचे चैकशी नंतर दाखल करण्यात आला आहे.

एवढेच नव्हे तर ! या भामटयाने फ्लॅट देतो म्हणुन अमिष दाखवुन वकील, पोलीस कर्मचारी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक या सारख्या सरकारी अधिकारी यांना देखील लांखोचा गंडा घातला आहे. सन 2010 च्या दरम्यान सचिन पवार हा एक माथाडी कामगार म्हणुन ए पी एम सी मार्केट मध्ये काम करीत होता. त्याने मार्केट मधील इतर माथाडी कामगार यंाना घरासाठी कर्ज काढुन देतो म्हणुन कामगांराची फसवणुक केली आहे. या भामटयाने त्याच्या घरचे लोकांना सोडले नसुन, त्याने दोन वेगळया जातीच्या महीला बरोबर संसार थाटले असुन, त्यांचा उपयोग सिडको मधुन लाॅटरी मध्ये निघाणा-या मालमत्तेच्या खरेदी करण्यासाठी करीत असतो. त्यामधील एक पत्नी अनुसुचित जातीची असुन, दुसरी मराठा समाजाची आहे. त्याने आतापर्यत खारघर सारख्या ठिकाणी 3 ते 4 फ्लॅट व 4 ते 5 शाॅप, पनवेल येथे जमीन, गाडी, सोलापुर येथे शेत जमीन अशी बरीच मालमत्ता साठविली आहे.
खारघर येथे प्लाॅट नं. ई 95 सेक्टर 12 येथे एक रो हाउस की ज्याचा मालक संतोष रस्तोगी याचा वाशी पोलीस ठाणे येथे 302 मध्ये मयत झाला असल्याचा गुन्हा दाखल आहे. मयताचे वारस जिवंत असतांना देखील त्याने एका स्थानिक पोलीस शिपाई मदतीने रो हाउसवर कब्जा करीत मालमत्ता ताब्यात घेतली आहे. रो हाउस चा सचिन पवार उपभोग घेत आहे. खारघर सारख्या शहरामध्ये पाणी टंचाई असतांना देखील रातो रात पाईप लाईन खोदुन पाणी चोरी करीत आहे. अशाच प्रकारे सचिन पवार याने वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मदतीने कंळबोली येथील 100 मीटरचा भुखंडावर कब्जा करून तीन माळयाची इमारत बांधली आहे. त्याने खारघर मध्ये बरीच गाळे भाडयाने घेण्याच्या बहाण्याने घेउन त्यांचे कोणत्याही प्रकारचे भाडे न देता बेकायदेशिर कब्जा केला आहे. यामध्ये त्याची पत्नी स्नेहाकिंता पवार, दाजी लक्ष्मण कासविद यांचा देखील समावेश आहे.
या भामटयाला काही स्थानिक पुढारी, नगरसेवक, पोलीस तसेच दोन नंबरची लोकांची साथ असल्याने, पांढ-या पोशाखातील भामटा जन्माला आला आहे. त्याचेवर नवी मुंबई 3 ते 4 गुन्हे दाखल असुन, पनवेल कोर्ट, मुंबई कोर्ट येथे केसेस पेडींग आहेत . तसेच अजुन कोणाची फसवणुक झाली आहे का ? त्यांना समोर येण्याचे आव्हान पोलीसांनी केले आहे. सध्या हा भामटा फरार आहे.