मुंबई , दि. ०१ (प्रतिनिधी) – एकाच पुनर्वसन सदनीकेसाठी एकापेक्षा अनेक जणांना ताबापत्र वाटप केला हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहारातून झाला असून विकासकाला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली जेरबंद करण्याची मागणी टी एम कांबळे गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
अंधेरी एमआयडीसी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत प्रकल्प राबविण्यात येत आहे, त्या-त्या काळातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासक विमल शहा व त्याचा मास्टर माईंड साथीदार महादलाल मुर्जी पटेल या चोरांनी शासनाच्या प्रकल्पात महाचोरी केली आहे.
वेगवेगळ्या प्रकारचा डल्ला मारून धनदांडगे झालेल्या संबंधित एमआयडीसी अधिकारी व पोलीस अधिकारी तथा विकासक विमल शहा आणि महादलाल मास्टरमाईंड मुर्जी पटेल यांनी वंशावळ संपत्ती तपासावी व जेरबंद करावी असे वारंवार सांगूनही कोणतीच कारवाई होत नसल्याची खंत डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.
विद्यमान एमआयडीसी कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी विकासकाला इफएसआय ची इमारत बांधकाम थांबवणे बाबत सूचना देऊनही विकासकाने बांधकाम बंद न करून चालूच ठेवून नियम व आदेशाचे उल्लंघन केले असून असे प्रकार व चोऱ्या केलेले वारंवार दिसून आले आहे.
विकासकाने स्वतःच्या दादागिरीचा प्रत्येय सातत्याने देऊनही प्रशासन मुसक्या अवळण्यात का कमी पडत आहे? किंबहुना प्रशासनाणे आपली हात या प्रकरणात तर गोवली नसतील ना ?? असाही प्रश्न निर्माण होतो. विकासकाची दादागिरी हाणून पाडण्यासाठी अश्या प्रवृत्तींना कायद्यान्वये ठेचून काढणे महत्वाचे असल्याचे मत डॉ. राजन माकणीकर व राज्य महासचिव कॅ. श्रावण गायकवाड तक्रारीत व्यक्त केले आहे.