Home परभणी आगीत भस्मसात झालेल्या भागात पशुधनासाठी चारा छावण्या उभाराव्यात – सखाराम बोबडे पडेगावकर

आगीत भस्मसात झालेल्या भागात पशुधनासाठी चारा छावण्या उभाराव्यात – सखाराम बोबडे पडेगावकर

384

प्रत्यक्ष घटनास्थळासही दिली भेट

प्रतिनिधी

दोन दिवसापूर्वी आगीत जळून भस्मसात झालेल्या डोंगरगाव शिवारातील शेकडो हेक्टरच्याच्या क्षेत्रात मेंढपाळ व पशुपालकास साठी चारा छावण्या उभा कराव्यात अशी मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी मंगळवारी उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील यांना प्रत्यक्ष भेटून केली.

दुपारी सखाराम बोबडे व त्यांचे सहकारी राहुल साबने यांनी प्रत्यक्ष आग लागलेल्या डोंगराची पाहणी करण्यासाठी डोंगरगाव शिवार गाठले. प्रत्यक्ष फिरून या भागात त्यांनी पाहणी केली. काही पशुपालक, शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. या आगीत सुमारे दोनशे हेक्टर च्यावर चराई क्षेत्र जळून खाक झाल आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या पासून या भागात शेळ्या, मेंढ्या व जनावरे चालण्यासाठी आणत असलेल्या पशुपालक व त्यांच्या जनावरावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर या जंगलात हरीण सारख्या जगली पशुधनाचा ही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. रखरखत्या उन्हात येथील झाडे जळून गेल्याने या जनावरांना उन्हापासून आश्रय मिळवायला सावलीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे ही जनावरे मानवी क्षेत्रात येऊन आपल्या अन्नाचा शोध घेत आहेत .एकूणच या भागातील जीवन चक्र या आगीमुळे बदललेले आहे. तरी या घटनेची प्रशासनाने दखल घेऊन या भागातील शेळ्यामेंढ्या व पशुपालकांच्या पशुधनासाठी चारा छावण्या व पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मंगळवारी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी पाटील यांनी याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.