घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव आणि परिसरात कोरोना महामारीचे रूग्ण वाढत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवसीय बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय कुंभार पिंपळगाव ग्रामपंचायत व्यापारी महासंघ, पोलिस प्रशासन यांच्या वतीने बंद चा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, जमावबंदी या शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले, बंदी उठल्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी अॅटीजन चाचणी करूनच दुकाने उघडावीत , चाचणी पाॅझिटीव्ह आल्यास दुकान उघडू नये .या तीन दिवसीय लाॅकबाउन संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने दवंडी देण्यात आली आहे.
*हे पण वाचा*
कोरोना महामारिच्या पार्श्वभुमीवर संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध कडक करण्यात यावेत , नेहमीच दुकानदारांनी ज्यांना मास्क नाही त्यांना सामान देवू नये. दुकानदारांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवून ग्राहकी करावी.अशा सुचना व्यापाऱ्यांनी दिला .