Home कृषि व बाजार मधमाश्यांचे पोळे झाले दिसेनासे , “टोळ कांदा शेतकरी माशा नसल्याने अडचणीत”

मधमाश्यांचे पोळे झाले दिसेनासे , “टोळ कांदा शेतकरी माशा नसल्याने अडचणीत”

423

तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून सल्ला मिळेना.

अंढेरा – प्रतिनिधी

बुलठाणा – चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली असून मात्र कांदा उत्पादन शेतकरी यंदा मधमाशा नसल्याने अडचणीचा सामना करीत आहे तरीही कृषी विभागाने सायकला सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

आयुर्वेदिक औषधी शास्त्र मधालाअनन्य साधारण महत्व आहे. परंतु औषधी गुणधर्माचा अंतर्भाव असलेले मध दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे. सततची जंगल तोड यामुळे कमी होणारे वृक्ष याचा परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने मधमाशांचा आसराही हिरव ला जात आहे. त्यामुळे माशांना मद्याकरिता पोळे घालता येत नाही परिणामी मधाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे.
परिसरातील जंगल भागाला लागून असलेली गावे नैसर्गिक वनसंपादने साठी प्रसिद्ध आहे. मात्र वातावरणातील बदल मानव निर्मिती प्रदूषण वृक्षतोड यामुळे मधमाश्यांची संख्या घटल्याने शेतातील टोळ कांद्यामध्ये बी भरण्याकरिता माशांचा उपयोग होत असते तसेच मधमाशा पालन करून मध निर्मिती उद्योगाला चालविला जात नसल्याने नैसर्गिक मध मिळणे दुरापास्त होते आहे. सर्दी खोकला यासारख्या आजारावर प्राथमिक उपचार म्हणून मधाचा वापर केला जातो.

ग्रामीण भागा सोबतच शाहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मध खरेदीला प्राधान्य देतात सर्वसामान्य जनतेला मिळणारे मध जंगलातून जमा गोळा केलेजाते नैसर्गिक मधाची सर्वसामान्यांपासून तर श्रीमंत लोक आवडीने खरेदी करतात. पण हे चविष्ट मध दिवसान दिवस दुर्मिळ होत आहे. वाढत्या लोकसंख्या मुळे जंगल भुईसपाट होत आहे. परिणामी जंगलात वास्तव्य करणाऱ्या मधमाशांची संख्या कमी झाली असून याचा परिणाम अनेकांच्या रोजगारावर होत आहे तसेच शेतामध्ये करण्यात येणाऱ्या कीटकनाशक फवारणीचा परिणामही मधमाशांची संख्या घटत आहे. त्यातच जंगलांना लागणाऱ्या वनव्यामुळे वन संपत्ती धोक्यात आली आहे.
आधीच शेतकरी एका वर्षापासून कोरोना महामारी च्या संकटात पिचला गेला असून पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही.

तसेच पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक केले असून सध्या त्या कांद्यामध्ये बी भरण्याकरता माशाचा उपयोग होतोय परंतु यावर्षी माशाच नसल्याने शेतकऱ्यांचे लावलेले पैसेही वसूल होतील याची सुद्धा खात्री नाही यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सहायकांना सूचना देऊन मार्गदर्शन करावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून होत आहे.