जिएचे नेटवर्क गायब : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
ईकबाल शेख
वर्धा / तळेगांव (शा.पं..) :- जिओ मोबाईल टाॅवर असलेल्या कंपनीने विज बिल भरले नसल्याने महावितरने गेल्या तिन दिवसापुर्वी विज पुरवठा खंडीत केल्यामुळे जिअो मोबाईल कंपनीचे नेटवर्कच गायब झाल्याने विद्यार्थ्यांचे सुरु असलेले आॅनलाईन क्लास होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमानात शैक्षणिक नुकसान होत आहे तर इतरहि नागरीक त्रस्त झाले आहे. परिसरात जिअोचा वापर करणारे ग्राहक अधिक प्रमाणात आहे.चार दिवसापासुन अनेक कामे नेटवर्क अभावि रखडले जात आहे.
सर्वच ठिकाणी डिजीटल पद्धतीचा अवलंब करत असतांना वेगवान नेटवर्कची आवश्यकता भासते मात्र तळेगांव परिसरात असलेल्या जिअो कंपीच्या मोबाईल टावर कडे महावितरनचे विद्युत बिल थकीत असल्यामुळे महावितरणे गेल्या तिन दिवसापुर्वी विद्युत पुरवठा खंडीत केला.परिसरात इतर नेटवर्क देणार्या कंपनीच्या तुलनेत जिअो कंपनीचा वापर करणारे नागरीक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जिअो कंपनीच्या ग्राहकांना इंटरनेट अभावी अनेक कामाचा खोळंबा होत आहे विशेषत: विद्यार्थ्यांचे शेक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या वर्षभर्यापासुन शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना महामारीने थैमाण घातल्याने सर्व शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वर्ग हे आॅनलाईन सुरु असुन काहि विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन परिक्षासुद्धा सुरु आहे. गेल्या वर्षभर्यापासुन वर्ग आॅनलाॅईन सुरु असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांपैकी कोणी तिन महिण्याचे तर कोणी वर्षभर्याचे रिचार्ज पॅकेज विकत घेतात तर बहुतांश नागरिक सुद्धा अशाचप्रकारे रिचार्ज पॅकेज घेतात. तेव्हा जिअो कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन आर्थिक भुर्दंड सोसत ऐन वेळेवर दुसर्या कंपनीचे मोबाईल सिमकार्ड विकत घ्यावे लागत असुन जिअो कंपनीच्या रिचार्जवर केलेला खर्चहि व्यर्थ जात आहे. तेव्हा जिअो कंपनीने ताबडतोब विद्युत पुरवठा सुरु करुन घेवुन चांगल्या प्रकारे ग्राहकांना नेटवर्क पुरवावे असी परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची मागणी आहे.
प्रतिक्रीया
१) मी सी.बी.एस.सी. १० वीला असुन माझी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने दररोज आॅनलाईन शालेय क्लास सुरु असुन दि. ३ एप्रिल पासुन शाळेची आॅनलाईन सराव परिक्षा आहे. परंतु तिन दिवसापासुन जिअो चे नेटवर्कच मिळत नसल्यामुळे मी आॅनलाईन क्लास करुच शकत नाहि परिक्षेकरीता मला वेळेवर दुसर्या कपनीचे सिमकार्ड विकत घ्यावे लागले.
कु. वंशिका विनोद खेरडे, विद्यार्थीनी
इनोवेटिव्ह माईंड स्कुल आॅफ एक्सलन्स, तळेगांव (शा.पं.)
२) कोरोनामुळे माझे अभियांत्रीकी महाविद्यालय बंद असल्यामुळे माझे क्लासेस आॅनलाईन सुरु आहे तेव्हा सर्वप्रथम दररोज आॅनलाईन अटेन्डन्स सबमीत करावे लागते. व लाईव्ह लेक्चर असल्याने नेटवर्क अभावी करु शकत नाहि यामुळे माझे शैक्षनिक नुकसान होत आहे.
कु. नम्रता भोजने, तळेगांव (शा.पं.), विद्यार्थीनी
पी. अार. पाटील काॅलेज आॅफ इंजीनीअरींग, अमरावती.