Home मराठवाडा होता जिवा म्हणून वाचला शिवा’

होता जिवा म्हणून वाचला शिवा’

535

आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या तरूणाचे माजी सैनिकाने वाचविले प्राण

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील बोरी या छोट्याशा गावात एका युवकाने बेरोजगारीला कंटाळून राहत्या घरातच गळफास घेतला.हि घटना वाऱ्यासारखी गावात पसरली,लोक भराभर जमा झाले,मात्र त्या युवकाला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हते, सर्वांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली, काही लोक वाचवा… वाचवा म्हणून आरडाओरड करत होते.याच वेळी हा सर्व गोंधळ पाहून एक माजी सैनिक धावत पुढे आला.त्याने प्रथम त्या युवकाच्या गळ्यातील फास बाजूला काढून त्यास खाली घेतले.त्यानंतर त्यास कृत्रिम श्वास दिला …त्या युवकाचे हृदयाचे ठोके सुरू झाले याबाबत खात्री पटल्यावर त्या माजी सैनिकांचे अंतर्मन गदगद होवू लागले …..देवदूत बनून आलेला कोण होता तो माजी सैनिक ?? या बाबतीत जाणून घेवू यात .
राजू साहेबराव निर्मळ असे या माजी सैनिकाचे नाव आहे . जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील बोरी येथील मुळ रहिवासी असून घनसावंगी तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत.राजू निर्मळ हे सुट्टी असल्याने बोरी या गावी आलेले होते.कोरोना महामारीच्या दडपणामुळे हाताला काम नसल्याने बोरी गावातील एक युवक अलिकडे नैराश्यात जगत होता .पुर्वीच वडिलांचे छत्र हरपले होते.घरात आई आणि पत्नी असा परिवार आहे.बेरोजगारीला कंटाळून या युवकाने राहत्या घरी गळफास घेतला.तेव्हा गावातील लोक जमा झाले, आरडाओरडा सुरू होता.तेव्हा राजू निर्मळ या माजी सैनिकाने धाव घेऊन या युवकाचे प्राण वाचवले.घनसावंगीचे तहसिलदार नरेंद्र देशमुख यांनी राजू निर्मळ यांचा सत्कार करून निर्मळ यांचे कार्य अभिमानास्पद असल्याचे म्हटले.सैन्य दलात सैनिकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते.या प्रशिक्षणामुळेच मी या युवकाचे प्राण वाचवू शकलो याचे समाधान आहे.आपत्कालिन परिस्थिती मध्ये युवकांनी न डगमगता पुढे आले पाहिजे असे राजू निर्मळ म्हणाले.दरम्यान,या युवकाला ग्रामस्थांच्या वतीने शक्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन युवकांनी दिले.