Home मराठवाडा वाटुर ते चारठाणा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी २२८ कोटी रुपयांची मंजुरी

वाटुर ते चारठाणा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी २२८ कोटी रुपयांची मंजुरी

265

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाला यश

जालना – लक्ष्मण बिलोरे

बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा वाटूर ते चारठाणा सिमेंट कॉंक्रीट चा रस्ता व्हावा यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वारंवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता .मागील पंचवार्षिक मध्ये पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून कार्यभार असताना अनेकदा लोणीकर यांनी गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश आले असून वाटुर ते मंठा देवगाव फाटा चारठाणा असा २२८ कोटी रुपयांचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गडकरी या नावाप्रमाणेच “रोडकरी” या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. शेगाव ते पंढरपूर तीन पदरी २००० कोटी रुपयांचा सिमेंट कॉंक्रिटचा राष्ट्रीय महामार्ग माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला असून तो रस्ता पूर्णत्वास गेला आहे त्यानंतर औरंगाबाद जालना नांदेड या रस्त्यावर असणाऱ्या वाटुर फाटा – मंठा – देवगाव फाटा ते चारठाणा असा १० मीटर रुंदी असणारा सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे त्यासाठी २२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून हा रस्ता निर्मिती होणार आहे. लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन केले जाणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून हा रस्ता मंजूर व्हावा यासाठी लोणीकर यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. वारंवार नितीनजी गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून, फोनवरून तथा पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. आता लोणीकर यांच्या या सर्व पाठपुराव्याला यश आले असून लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून दर्जेदार असा रस्ता जनतेसाठी उपलब्ध होणार आहे परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये साधारणतः २२ किलोमीटर तर परभणी जिल्ह्यामध्ये साधारणतः १२ किलोमीटर पर्यंतचा रस्ता आहे

*लोणीकर यांनी मानले गडकरींचे आभार*
जालना ते वाटूर फाटा पर्यंत चौपदरी राष्ट्रीय महामार्ग असून पुढे मात्र दर्जेदार अशा रस्त्याची आवश्यकता होती ही आवश्यकता लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्यासाठी वारंवार विशेष मागणी केली होती त्या मागणीला यश आलं असून २२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे शेगाव ते पंढरपूर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्या प्रमाणे वाटुर फाटा ते चारठाणा सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर केल्याबद्दल जालना व परभणी जिल्ह्यातील जनतेच्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.