Home मराठवाडा दोन अट्टल दुचाकी चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दोन अट्टल दुचाकी चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

147

चोरीच्या ३५ दुचाकी जप्त,८,२६०००/रूपये किंमतीचे दुचाकी वाहने जब्त

औरंगाबाद गुन्हे शाखेची कामगिरी

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. १८ :- शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने चोरी करणा-या दोन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या गुन्हे शाखा पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेल्या चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी ८ लाख २६ हजार रूपये किमतीच्या तब्बल ३५ दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अय्याज शेख मुमताज (वय २८, रा.शंभुनगर, गारखेडा परिसर), शेख शाकेर शेख रज्जाक (वय ३२, रा.इंदिरानगर) असे अटक केलेल्या वाहन चोरट्यांची नावे आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला होता. दररोज दोन ते तीन दुचाकी वाहने चोरीला जात असल्यामुळे वाहनधारकांत खळबळ माजली होती.
दरम्यान, शेख अय्याज व शेख शाकेर हे दोघे दुचाकी वाहन चोरी करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.आहे या कार्यवाहीत पो हे , का रामदास गायकवाड , पो , हे का , शेख नजीर , सतीश जाधव , चंद्रकात गवळी , मिसळ , शेख बाबर , सुधाकर राठोड , रविंद्र खरात , म , पो , का संजीवनी शिंदे इत्यादी कर्मचाऱ्यांनी या कार्यवाहीत सहभाग घेतला.