Home बुलडाणा बिना अनुदानि शाळेवरील शिक्षक पार्ट टाइम काम करून रेटताहेत संसार गाडा…!

बिना अनुदानि शाळेवरील शिक्षक पार्ट टाइम काम करून रेटताहेत संसार गाडा…!

185

 

-(रवि जाधव)

देऊळगाव राजा:-शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम आणि उर्वरीत वेळेत मिळेल ते पार्ट टाइम काम करून आलेल्या पैशातून संसाराचा गाडा हाकण्याची वेळ राज्यातील बिनाअनुदानी शाळांतील हजारो शिक्षकांवर व महिलांवर आली आहे.आज ना उद्या अनुदान मिळेल या आशेवर त्यांनी आता चाळीशीही ओलांडली आहे.शिक्षकांना भविष्याची चिंता आता सतावत असून एक एक दिवस त्या आशेवर काढत आहे.आता दुसरी नोकरी लागण्याची वेळ निघून गेल्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा याची चिंता या महिला व शिक्षकांना सतावत आहे. एवढे मात्र खरे….!

*शिक्षकांच्या व्यथा*
सरकार आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही मुंबईतील आझाद मैदानावर 38 दिवस आंदोलन केले कोरोनाच्या नावावर सरकारने आंदोलनही हूसकावले आता न्याय मागायचा कुठे….?
शिक्षक:-लक्ष्मण शंकरराव दांडगे