Home जळगाव नशिराबाद येथे बंद पथदिवे वर एम आय एम तर्फे मोंबत्या

नशिराबाद येथे बंद पथदिवे वर एम आय एम तर्फे मोंबत्या

403

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या वतीने बंद पथदिवे वर मोंबत्या लाऊन जाहीर निषेध करण्यात आले.

विजेच्या थकीत बिल ना भरल्याने पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आले. ग्रामपंचायत थकीत कर भरत नसल्याने ग्रामस्थ १० दिवसा पासून अंधारात राहत आहे. त्या मुळे संतप्त एम आय एमच्या व नागरिकांनी ताज नगर परिसरात बंद पडलेले पथदिवे वर मोमबत्या लावण्यात आल्या.

ग्रामपंचायत कडे पथदिव्यांचे ८९ लाख रुपयांची थक बाकी असल्यामुळे वीज वितरण विभागने पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. त्या मुळे गावातले लोकांना अंधाराच्या सामना करावा लागतोय, पथदिवे लावताना ए आय एम आय एम शहर अध्यक्ष आसिफ शेख, शहर सचिव सलमान शेख, उपसचिव रईस शेख, महमूद बिल्डर, अनिस शेख, रब्बान खान, अल्ताफ मण्यार, शोएब शेख, ईसा शेख, मोहम्मद खान, रइस मण्यार, व सर्व नागरिक उस्थित होते.