Home विदर्भ लसीकरण वाढल्याने सध्याची परिस्थिती बदलेल – प्रशांत सव्वालाखे

लसीकरण वाढल्याने सध्याची परिस्थिती बदलेल – प्रशांत सव्वालाखे

151

नगराध्यक्षांनी घेतली कोरोना लस

जनजागृती मोहिमेमुळे वाढता प्रतिसाद

ईकबाल शेख

उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे नगराध्यक्ष प्रा.प्रशांत सव्वालाखे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ मोहन सुटे, डॉ.नंदकिशोर कोल्हे यांचे उपस्थितीत कोरोनाची लस घेतली. यावेळी रणजित काटकर, प्रदीप भारल, अतुल जीरापुरे, सतीश दळवी, रमेश दहाट, विठ्ठल देशकर, कृष्णा काळे, अभिजित फुलझेले, महेंद्र दुधाट यांचेसह 245 जणांनी लस घेतली.
भारतात कोरोना लसीकरण वेगानं सुरू असतांना दुसऱ्या बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतांना दिसत आहे. त्यामुळे काही भागांत निर्बंध लागू करण्याची वेळ आली आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यानं प्रशासनानं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना लसीकरणाचा वेग वाढल्यानं दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे. दिवसागणिक लसीकरणाचा वेग वाढत आहे. लस घेतलेल्या लोकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती बदलेल अशी आशा नगराध्यक्ष प्रा प्रशांत सव्वालाखे यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत 4771 जणांनी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे मोफत लसीकरणाचा लाभ घेतला असून नगर परिषद द्वारे जनसंपर्क मोहीम, जाणे व येण्यासाठी वाहनांची व्यवस्था, नगराध्यक्ष तथा नगरसेवक यांचे जनजागृती अभियान, उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग, महसूल विभाग यांचे एकत्रित प्रयत्न सुरू असल्याने लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे व प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित सूचनांचे पालन करावे असे नगराध्यक्ष प्रा.प्रशांत सव्वालाखे यांनी आवाहन केले.