Home विदर्भ 8 मृत्युसह 425 जण यवतमाळ जिल्हात पॉझेटिव्ह आणि 380 कोरोनामुक्त

8 मृत्युसह 425 जण यवतमाळ जिल्हात पॉझेटिव्ह आणि 380 कोरोनामुक्त

355

    यवतमाळ, दि. 4 : गत 24 तासात जिल्ह्यात‌ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 380 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 52 व 62 वर्षीय पुरुष आणि 56 व 76 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 50 वर्षीय महिला आणि तालुक्यातील 80 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 425 जणांमध्ये 290 पुरुष आणि 135 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 160 जण पॉझेटिव्ह, उमरखेड 69, पांढरकवडा 29, आर्णि 23, पुसद 22, नेर 21, दिग्रस 17, वणी 16, घाटंजी 14, बाभुळगाव 11, महागाव 11, राळेगाव 8, मारेगाव 7, झरीजामणी 7, दारव्हा 5, कळंब 3 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

            रविवारी एकूण 4069 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 425 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3644 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3173 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1463 तर गृह विलगीकरणात 1710 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 30651 झाली आहे. 24 तासात 325 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 26794 आहे. तर जिल्ह्यात एकूण 684 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.75 असून मृत्युदर 2.23 आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 285160 नमुने पाठविले असून यापैकी 283050 प्राप्त तर 2110 अप्राप्त आहेत. तसेच 252399 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.