जालना – लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्यात आरटीपिसिआर चाचण्यांचे प्रमाण ७५ टक्क्यांवर करणे ,होमआयसोलेशनपेक्षा संस्थात्मक अलगीकरणावर भर देणे लसिकरणाच्या मोहिमेला अधिक गती देणे , मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे , शासकीय व खाजगी रूग्णालयातील बेडचे एक केंद्रीय पद्धतीने नियोजन करणे ,ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला सुचना दिल्या आहेत.जालना जिल्ह्यातील कोरोना महामारिच्या पार्श्वभुमीवर प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक झाली.यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पद्मजा सराफ, डॉ,प्रताप घोडके, डॉ.संजय जगताप, डॉ.संतोष कडले, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर,अन्न व औषध प्रशासन अधिकारी अंजली मिटकर सह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.