Home मराठवाडा लवकरच राज्यातील काही मंत्री आणखीन राजीनामे देतील , रावसाहब दानवे

लवकरच राज्यातील काही मंत्री आणखीन राजीनामे देतील , रावसाहब दानवे

408

अमीन शाह

जालना – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आणखी काही मंत्री राजीनामे देतील , असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे . पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी परमबीर सिंह यांच्या आरोपावरून न्यायालयाने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना चपराक दिली होती . त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला . याबद्दल बोलताना दानवे यांनी ‘ ईटीव्ही भारत’शी बोलताना , “ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली , मात्र शिवसेनेने भाजपसोबत दगाफटका केला . जनतेने युती म्हणून त्यांना मतदान केले होते आणि शिवसेनेने जनतेचा विश्वास तोडला . त्यामुळे जनतेचा आता या सरकारवर भरोसा नाही आणि सरकारही जनतेची कामे करत नाही . त्यामुळे आम्ही विषयांमध्ये पडायचे नाही . गृहमंत्र्यांचा राजीनामा हे भाजपचे यश नाही , तर जनतेचा आमच्या वरचा विश्वास हे आमचे यश आहे , ” असे म्हणत आता तरी दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत . भविष्यात अनेक मंत्री राजीनामा देतील , असे भाकीतही खासदार दानवे यांनी केले . मात्र , राजीनामे देणारे मंत्री कोणत्या पक्षाचे असतील याविषयी बोलण्याचे टाळले.भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताने जालन्यातील संभाजीनगर भागात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात खासदार दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . यावेळी सिद्धिविनायक मुळे , भास्कर दानवे , राजेश राऊत , अशोक अण्णा पांगारकर , सतीश जाधव , श्रीकांत घुले आदींची यावेळी उपस्थिती होती .