Home नांदेड पत्रकारांवरील हल्ला प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करा – “पत्रकार संरक्षण समिती”...

पत्रकारांवरील हल्ला प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करा – “पत्रकार संरक्षण समिती” ची मागणी

571

नांदेड  – नांदेड शहरातील दै.नांदेड पुकारचे संपादक शेख याहीया शेख ईसाख हे दिनांक ५ एप्रिल रोजी पाऊने नऊच्या सुमारास आपल्या कारमध्ये बसून घराकडं जात असताना त्यांना देगलुर नाक्यावर अडवून तु माझी बातमी पेपरला का दिलीस म्हणून सदरील आरोपीनी मारहाण केली आणि त्यांचा कॕमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला व संपादकास मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चैन बळजबरीने काढून घेतली या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदरील आरोपींची चौकशी करुन त्यांना पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिनांक 5 एप्रिल रोजी देगलूर नाका येथील खुबा हॉटेल समोर दैनिक नांदेड पुकारचे संपादक शेख याहीया हे देगलूर नाका येथे ट्राफिक जाम झाल्याचे व्हिडीओ शूटिंग करीत असताना संबंधित आरोपींनी आमचे विरुद्ध बातमी का छापली म्हणून संपादकाला शिवीगाळ करून कॅमेरा हिसकावन्याच्या प्रयत्न केला व गळ्यातील साखळी चोरून नेली या प्रकरणी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड , जिल्हा सचिव शशिकांत गाढे,जिल्हासंघटक शेख मौला,शहराध्यक्ष नकूल जैन,वरिष्ठ पत्रकार विलास आडे आदींची स्वाक्षरी आहे.