Home जळगाव रावेर नगरपालिका हद्दीत तात्काळ सॅनीटायझरची फवारणी करा, राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी ..

रावेर नगरपालिका हद्दीत तात्काळ सॅनीटायझरची फवारणी करा, राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी ..

174

रावेर (शरीफ शेख)

रावेरमध्ये कोरोना विषाणूचा वाढता पादुर्भाव लक्षात घेवून रावेर शहरात निर्जंतूकीकरण करण्यासाठी फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेला आज निवेदनाद्वारे केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोरोनाची दुसरी लाट फारचं घातक सिद्ध झाले असून याकाळात मोठ्या प्रमाणात 50 वय वर्ष च्या आतील रुग्ण आढळून येतं आहे, तसेच त्यांचा मृत्यूदर ही वाढत आहे, यामुळे प्रशासन यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे, कारण त्याला थोडाफार अटकाव करण्यासाठी सॅनीटायझर ची फवारणी अतिवाश्यक आहेचं, तसेच सोशल डिस्टन, माॅस्क वापर सक्तीच्या उपाययोजना करणे गरजेचे झाले असून ही यशस्वीपणे राबवून प्राथमिक स्तरावरील कार्य पूर्ण करावे, अशी मागणी रावेर शहराध्यक्ष मेहमूद शेख, कार्याध्यक्ष विलास ताठे, तालुका सरचिटणीस ईश्वर निळे यांनी मुख्याधिकारी राहूल लांडे नगरपालिका रावेर यांना नगरपालिका कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच लांडे यांनी सदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले कि, लगेच येत्या दोन-तीन दिवसांत सॅनीटायझर ची फवारणी रावेर नगरपालिका हद्दीत लवकरच केली जाईल.