चोकशी सुरू , धाबे दणाणले
देवानंद जाधव
यवतमाळ – पं स.अंतर्गत महाळुंगी ग्राम पंचायत कडे तालुक्यात सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणुन बघीतले जाते.बहुतांश सहीपुरते साक्षर असलेल्या या गावात अय-या गय-या ठेकेदारांनीही सचिवाला हाताशी धरुन शासनाची तिजोरी लुटण्याचे पाप केले आहे. निकृष्ठ कामाचा उत्कृष्ट नमुना म्हणुन तालुक्यात महाळुंगीचे शौचालय बांधकाम पाहीले जाते. गावात सहाशेच्यावर शौचालय बांधकाम केल्याचे कागदोपत्री नमुद केले आहे. माञ शेकडो अशिक्षीत लोकांच्या नावे बांधकाम न करताही पैस्याची ऊचल केल्याचे धक्कादायक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. ज्या शौचालयाचे बांधकाम केले ते अत्यंत निकृष्ठ आणि बकरी खेटुन गेली तरी पडणारे आहे.शोष खड्डे नाममाञ दोन अडीच फुट खोलीचे करुन प्रशासनाला शेंडी लावली आहे. डाव्या ऊजव्या हातापायाचे ठसे मारुन कामगारांचे मस्टर भरुन सरपंच.सचीव,रोजगार सेवक,आणि ठेकेदारांनी कामगारांची आणि प्रशासनाची फसवणूक करुन पन्नास लाखावर शौचालय बांधकामात भ्रष्टाचार केल्याची तक्रार वसंतराव नाईक विकास महामंडळ मुंबई चे माजी संचालक अनिल विजयसिंह नाईक राठोड यांनी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ संजय रायमुलकर यांचे कडे केली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली गेली आहे. या प्रकरणी जी.प.च्या चौकशी अधीका-यांनी चौकशी प्रारंभ केल्याने, शासनाचे खिशे कापणा-यांचे धाबे दणाणले आहे.तत्कालीन आणि विद्यमान ग्राम सेवकांनी खिशे कापणा-यांना कागदोपत्री मदत केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कामगार रुपी रत्नांची पारख करुन सचिव रतनपारखी यांनीही वाहत्या अरुणावती नदीत हात धुवून घेतले आहे. शिवाय विद्यमान ग्रामसेवक तममणे यांनी देखील भ्रष्टाचार करणा-यांना तन,मन, धनाने मदत करुन शासनाची तिजोरी रिकामी करण्याचे पाप केले आहे.या शौचालय भ्रष्टाचाराशिवाय महाळुंगी येथे नाली बांधकाम, शेततळी, सिमेंट नाला,सिमेंट नाली, ऊघडी गटारे, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, खड्डे खोदणे, झाडांना पाणी देणे. विहीर हातपंपे. सौरऊर्जा या सह असंख्य कामा मध्ये सुध्दा कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराला शेंडी फुटली आहे. शासन नियमानुसार नाला सरळीकरण करण्यासाठी मजुर न वापरता जे.सी.बी यंञाद्वारे केली. या कामासाठी असंख्य बोगस मजुर दाखऊन खोटे आणि बोगस मस्टर तयार करुन बिल काढण्यात आले. एका महाळुंगी या गावात कोट्यावधीचा भ्रष्टाचार असेल तर अवघ्या तालुक्यातील भ्रष्टाचाराचा आकडा हा डोळे पांढरे करणारा असेल. याची ऊच्च स्तरीय चौकशी करावी असी अपेक्षा अनिल नाईक यांनी व्यक्त केली. महाळुंगी मधील दोषीवर फौजदारी कारवाई करुन भ्रष्टाचाराची संपुर्ण रक्कम संपत्ती आणि पगारामधुन वसुल करावी, खोटे कागदपञ दाखल करुन तिजोरी लुटणा-यांना बेड्या ठोकाव्या अन्यथा न्यायालयात दाद मागण्याचा ईशारा वसंतराव नाईक विकास महामंडळ मुंबई चे माजी संचालक अनिल विजयसिंह नाईक राठोड यांनी दिला आहे.