Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात 643 जण कोरोनामुक्त तर 627 नव्याने पॉझेटिव्हसह 8 जणांचा मृत्यु

यवतमाळ जिल्ह्यात 643 जण कोरोनामुक्त तर 627 नव्याने पॉझेटिव्हसह 8 जणांचा मृत्यु

693

  यवतमाळ, दि. 10 : गत 24 तासात जिल्ह्यात 643 जणांनी कोरोनावर मात केली असून 627 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर आठ जणांचा मृत्यु झाला. कोरोनातून बरे झालेल्या व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 643 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 43, 73, 84, 89 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 41 वर्षीय महिला आणि पुसद येथील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 627 जणांमध्ये 424 पुरुष आणि 203 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 198 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 66, वणी 52, पुसद 51, दिग्रस 48, पांढरकवडा 45, बाभुळगाव 31, घाटंजी 27, दारव्हा 19, आर्णि 18,  मारेगाव 17, झरी 17, नेर 16, महागाव 12, कळंब 5, राळेगाव 2 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.

            शनिवारी एकूण 4079 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 627 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3452 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3145 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1840 तर गृह विलगीकरणात 1305 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 33330 झाली आहे. 24 तासात 643 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 29451 आहे. तर जिल्ह्यात एकूण 734 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.84 असून मृत्युदर 2.20 आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 306922 नमुने पाठविले असून यापैकी 305550 प्राप्त तर 1372 अप्राप्त आहेत. तसेच 272220 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.