यवतमाळ, दि. 13 : गत 24 तासात 23 मृत्युसह जिल्ह्यात 953 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 451 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 70, 70, 62, 78 वर्षीय पुरुष व 40, 56, 68, 76 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 52, 60, 65 वर्षीय महिला, पुसद येथील 53 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 60 व 75 वर्षीय पुरुष, वणी येथील 70 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 52 व 57 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 58 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 60 वर्षीय पुरुष, नागपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष आणि हतगाव (जि. नांदेड) येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 953 जणांमध्ये 600 पुरुष आणि 353 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 396 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 168, उमरखेड 83, पांढरकवडा 49, आर्णि 43, दिग्रस 38, दारव्हा 35, नेर 29, महागाव 22, घाटंजी 20, वणी 19, बाभुळगाव 15, मारेगाव 15, झरी 10, राळेगाव 4, कळंब 3 आणि इतर शहरातील 4 रुग्ण आहे.
मंगळवारी एकूण 4232 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 953 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3786 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2051 तर गृह विलगीकरणात 1735 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 35591 झाली आहे. 24 तासात 451 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 31023 आहे. तर जिल्ह्यात एकूण 782 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.12 असून मृत्युदर 2.20 आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 320007 नमुने पाठविले असून यापैकी 317823 प्राप्त तर 2184 अप्राप्त आहेत. तसेच 282232 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.