यवतमाळ, दि. 14 : गत 24 तासात 13 मृत्युसह जिल्ह्यात 790 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 501 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 39 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 45, 55, 80 वर्षीय पुरुष, नेर येथील 40 वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 55, 55 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला, मानोरा (जि. वाशिम) येथील 68 वर्षीय पुरुष आणि वर्धा येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 720 जणांमध्ये 460 पुरुष आणि 330 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 261 पॉझेटिव्ह रुग्ण, दारव्हा 97, पुसद 85, उमरखेड 62, पांढरकवडा 59, कळंब 49, वणी 46, बाभुळगाव 33, दिग्रस 33, महागाव 25, आर्णि 12, मारेगाव 10, झरी 5, राळेगाव 3, नेर 2 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे.
बुधवारी एकूण 3376 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 790 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2582 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4062 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2153 तर गृह विलगीकरणात 1909 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 36381 झाली आहे. 24 तासात 501 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 31524 आहे. तर जिल्ह्यात एकूण 795 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.23 असून मृत्युदर 2.19 आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 323819 नमुने पाठविले असून यापैकी 321202 प्राप्त तर 2617 अप्राप्त आहेत. तसेच 284821 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.