Home सोलापुर 🔴 बोरगांवच्या शाळेचा प्रताप

🔴 बोरगांवच्या शाळेचा प्रताप

232

शैक्षणिक सहलीचे नियम धाब्यावर बसवून अवैध खाजगी वाहनाने काढली कर्नाटकात सहल◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

सोलापुर , दि. १९ :- अक्कलकोट तालुक्यातील विद्या विजय प्रशाला बोरगाव दे येथील शाळेने शनिवार दि १८ रोजी शैक्षणिक सहलीचे नियम धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूकीने ( क्रूझर जीप) कर्नाटक राज्यातील विजापूर गोलघुमट आणि आलमट्टी धरण येथे एक दिवशीय सहल आयोजित करण्यात आली होती. शैक्षणिक सहल आयोजित करताना सहलीसाठी २२ प्रकारची कागदपत्रे सादर करावे लागतात तेव्हाच शिक्षण विभाग सहलीसाठी परवाना देत असतात.पण असे असताना मुख्याध्यापक यांच्या संगनमताने ही सहल शैक्षणिक नियमांची चाकोरी घालून देऊन ही जुनाट व बंद पडक्या खाजकी वाहनाने प्रवास करीत दिवसभर शालेय विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान नाहक त्रास देत बुक्कीचा मार सोसावा लागला आहे. यामुळे बोरगाव येथील विद्यार्थ्यांच्या पालकातून नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. शाळेतील शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना परिसर ज्ञान मिळावे. यासाठी शाळांकडून दरवर्षी शैक्षणिक सहल काढण्यात येते.काही वर्षा पूर्वी शैक्षणिक सहल काढण्यासाठी फारशा परवानग्यांची गरज न्हवती.परंतु काही दुर्दैवी घटनांमुळे शाळांना शैक्षणिक सहलीसाठी काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.त्यासाठी एक न्हवे तर तब्बल २२ प्रकारची कागदपत्रे गोळा करावी लागतात.

■ या आहेत अटी – १०० रुपयांचे स्टॅम्प ,शाळा समितीचा ठराव, सहल जीआर, गटशिक्षणाधिकारी पत्र, एसटी आगारप्रमुख पत्र, केंद्र प्रामुखाचे पत्र, शिक्षण विस्तार अधिकारी पत्र, पालकांचे संमती पत्र, विद्यार्थी संमतीपत्र, नियमावली, विद्यार्थी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, विद्यार्थ्यांचा विमा,शिक्षण अधिकारी मान्यता, सहल महाराष्ट्रा बाहेर जात नसल्याचे मुख्याध्यापकाचे हमी पत्र असे आदी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच शिक्षण अधिकारी शैक्षणिक सहलीस परवाना देत असतात.
पण असे न होता कोणत्याच नियमाला थारा न देता लग्नाला गेल्याप्रमाणे वऱ्हाडी लोकांना घेऊन गेल्याप्रमाणे आणि कोंबड्या भरल्याप्रमाणे क्रूझर गाड्यात शालेय विद्यार्थ्यांना भरून सहा ते सात जीप गाड्या भरून कर्नाटक राज्यातील विजापूर व आलमट्टी येथे अवैध पध्दतीने सहल घेऊन जाऊन शिक्षण खात्याला अंधारात ठेऊन मनमानी कारभाराचा प्रताप दाखवला आहे.

१.कोट:- शाळेसारख्या पवित्र ठिकाणी जर नियमांची पायमल्ली होत असेल तर बाकीचे काय करतील असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. सहलीसाठी नियोजित वेळ काळ व सहाशे रुपये फी सुद्धा ठरवली होती.खाजगी वाहनाने सहल जाणार नाही असे विद्यार्थ्यांनाही सांगण्यात आले होते. पण असे न करता अटी व नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांचे जीव वळचणीवर लावून खुशाल सहल आयोजित करून शाळेने कळस गाठला आहे.या बाबत शिक्षणमंत्री , शिक्षण संचालक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार करणार असून विद्या विजय प्रशाला बोरगाव दे या शाळेची सखोल चौकशी करावी व संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई व्हावी ही विनंती.

गजेंद्र भि. गुरव
पालक बोरगाव दे ता अक्कलकोट
कोट -२.बोरगाव येथील शाळेची गेलेली सहल ही आमचा कोणताही परवाना घेऊन गेली नाही. शिक्षण विभागाने तयार केलेल्या अटी व नियमानुसार सहल घेऊन न जाता अवैध पद्धतीने घेऊन गेली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांची संबंधित शाळेची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
सुहास गुरव
शिक्षण विस्तार अधिकारी
पंचायत समिती अक्कलकोट