यवतमाळ जिल्ह्यात सध्या कोरोनाने जोर धरला आहे. रोज शेकडो रुग्ण सापडत आहेत, व अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागत आहे, शासकीय रुग्णालयात बेड ची कमतरता, ऑक्सिजन व रेमडीसीवर चा तुटवडा निर्माण होत आहे, तरी यात लवकरच वाढ करावी, व रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून लगेच त्यांच्या साठी कॉल सेंटर सुरू करण्यात यावे व ग्रामीण भागातील नागरिकांना तालुका स्तरावर उपचार ची सोय करावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपानराव भुमरे व खा. भावना गवळी यांना आम्ही यवतमाळकर टिमचे संयोजक अमित मिश्रा, कोअर कमेटी सदस्य विजय कुमार बुंदेला, आम्ही यवतमाळकर टिमचे शहर युवा अध्यक्ष आकाश सिंघानिया, सुधिर कैपिल्यवार यांनी आज सकाळी दिले.
आम्ही यवतमाळकर टिम ने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून मागील वर्षीच्या पाणी टंचाईच्या काळात आणलेल्या करोडो रुपयेच्या अमृत योजना घोटाळ्याची चौकशी करावी तसेच ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे व दोषींवर कडक फौजदारी कार्यवाही करावी. यवतमाळ शहरातील घनकचरा व्यवस्था बिघडली असून शहरातील स्वच्छतेचा दर्जा घसरला आहेत, सोबतच घंटागाडी कामगारा चे पगार सुद्धा ठेकेदार यांनी दिले नाही, अश्या ठेकेदार ला ब्लैकलिस्ट करावे. खाजगी दवाखाने कोरोना रुग्ण यांच्या उपचारचे भयंकर बेभाव पैसे घेत आहेत, आणि खाजगी दवाखान्यात नियम कोरोना नियमावली सुद्धा पाळत नाही आहेत. याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. खाजगी शाळा ची फीस पन्नास टक्के झाली पाहिजे, या वर्षी कोरोना ने पालकांची आर्थिक स्थिति ठीक नसल्याने ते पूर्ण फीस भरु शकत नाहीत. लॉकडाऊन काळातील विद्युत बिल माफ करा, आणि विज कापू नये. नगरपरिषद कडून घर टॅक्स माफ करावे, पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यामुळे जीवनप्राधिकरण कडून एक दिवसा आड पिण्याचे पाणी सोडण्यात यावे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बैंक च्या आर्थिक घोटाळा ची सीबीआय चौकशी हवी. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्या साठी प्रसिद्ध आहेत, इथे शेतकर्यांच्या माल भावाला लगेच नगदी पैसे द्यावे. बँड वाले, कलाकार, ऑटोवाले, कटिंगवाले, व छोटे व्यापारी यांना शासना कडून त्वरित तीस हजार रुपये महिना आर्थिक मदद करा असा मागण्यांचे निवेदन पालकमंत्री यांना दिले. या प्रसंगी बोलतांना निश्चितच या बाबींची दखल घेऊन योग्य ते कारवाई करण्याचे आश्वासन आम्ही यवतमाळकर टिमच्या शिस्ट मंडळाला दिला.