Home रायगड देवदूत मयुर शेळके याचा सामाजिक अपराध नियंत्रण एव भ्रष्टाचार विरोधी संस्थेकडून सन्मान

देवदूत मयुर शेळके याचा सामाजिक अपराध नियंत्रण एव भ्रष्टाचार विरोधी संस्थेकडून सन्मान

465

कर्जत जयेश जाधव

वांगणी स्थानकात स्वतःचा जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून रेल्वे कर्मचारी मयूर शेळके याने
अंध महिलेच्या लहान मुलाला वाचवण्यात यश आले त्याच्या या धाडस आणि शौर्य पाहून व माणसातल्या देवाचे दर्शन घडले.त्याच करावं तेवढ कौतुक कमीच आहेत..अशा या देवदूताचा सामाजिक अपराध नियंत्रण एव भ्रष्टाचार विरोधी संस्था यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या मार्गद्शनाखाली कर्जत तालुका उपाध्यक्ष रतन वसंत लोंगळे, सुप्रेश साळोखे,सेल अध्यक्ष शांताराम मिर्कुटे, महाराज शिवराम बुवा तुपे, मधुकर शिनारे यांच्या हस्ते श्री मयुर शेळके यांचा सन्मान चिन्ह सन्मानपूर्व देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्या दिल्या. याशिवाय मयुर शेळके या शौर्य वीराला रेल्वे बोर्डाकडून मिळालेले 50,000 रुपयाचे बक्षीस पत्रातील रकमेतील 25,000 रुपये मयुर ने त्या अंध मातेला दिल्याबद्दल त्यांचे संस्थेचे वतीने विशेष कौतुक केले.