राजेश एन भांगे
नांदेड जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाचा हाहाकार झाला असून यामध्ये जिल्ह्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.
यावेळी अत्यावस्थ प्रकृती असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारा साठी लागणारे रेमडेसीव्हर इंजेक्शन अवश्यक असून
मात्र ते इंजेक्शन सध्या बाजारात उपलब्ध नाही असे दाखवून मेडिकल औषधी दुकानदार चढ्या भावाने या इंजेक्शनची विक्री करत आहेत.
त्यामुळे अशा साठेबाजांवर तात्काळ कार्यवाही करून रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना उपलब्ध करून द्यावे
अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशसर चिटणीस
वसंत सुगावे पाटील यांनी निवेदना द्वारे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याकडे कडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात दिवसाला १००० ते १५०० रुग्णांना कोरोनाची लागण होत आहे.
तर आजवेळी अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर चिंताजनक आहे.
अशावेळी रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसीवर इंजेक्शन आवश्यक आहे.
त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी लक्षात घेऊन मेडिकल औषधी दुकानदार अन्न व औषध प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत.
यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. हे इंजेक्शन वेळेवर मिळाले नसल्यामुळे अनेक रुग्णांचा यावेळी दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.
व अनेक रुग्ण गंभीर असून रेमडेसीवर इंजेक्शन रुग्णांना सहजरीत्या व माफक दरात उपलब्ध होईल अशी व्यवस्था प्रशासना मार्फत करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर, राष्ट्रवादी ग्रंथालय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, राष्ट्रवादी सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष शादूल होणवडजकार, हणमंत जगदंबे आदी सदस्य उपस्थित होते.