ईकबाल शेख
वर्धा / तळेगांव (शा.पं.) :- राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील वळणावर २२ एप्रिलच्या रात्री १.३० वाजताच्या सुमारास ड्रायव्हरला झोपेची डुलकी आल्याने ट्रक दरीत १५० फूट कोसळला.
सुदैवाने या अपघात जीवीत हानी झाली नाही परंतु चालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहे.भंडारा येथुन राजकोटला जी.जे.०३ बी.व्हि.३६९९ क्रमांकाचा ट्रक रात्री १.३० वाजताच्या सुमारास सत्याग्रही घाटातुन लोखंडी राॅड घेऊन जात होता.तेव्हा त्याच क्षणी चालकाला झोपेची डुलकी आल्याने ट्रकचे संतुलन बिघडुन ट्रक सत्याग्रही घाटातील वळणावरील १५० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक महम्मद तय्युम सलामुद्दीन रा रीवा.मध्यप्रदेश व त्याचा सहकारी हे दोघेजण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पवण भांबुरकर, पोलीस शिपाई संजय शिंगणे,रोशन करलुके, देवेंद्र गुजर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना आर्वी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिकचा तपास तळेगांव पोलीस करीत आहे.