यवतमाळ – इकडे कोरोनाने कहर करून यवतमाळ करांचा जीव मेटाकुटीला आला असता निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांवर कोपत आहे .
बाबुळगाव तालुक्यातील सुकळी येथील शेतकरी रमेश लक्ष्मणराव वानोडे यांची चंदन आणि डाळींबाची बाग वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे शेतातील 2 हेक्टर वरील चंदनाची 2300 झाडे , डाळींबाची 2000 झाडे विद्युत पार्किंगमुळे 4300 झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असता आज दिनांक 24/4/21ला जिल्हाधिकारी यांना तेली समाज महासंघाच्या वतीने नुकसान भरपाई देण्यात यावी या करीता आशयाचे निवेदन देण्यात आले . सदर निवेदन देताना नुकसान ग्रस्त शेतकरी रमेश लक्ष्मणराव वानोडे , गजाननराव लांबटकर , तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ चे कार्याध्यक्ष विलास काळे , राज्य संघटक ज्ञानेश्वर रायमल यांच्या वतीने निवेदन देण्यात तसेच नुकसान भरपाई जर दिली गेली नाही तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात एस.पी. ला लवकरच निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत असेही उपस्थित असलेल्या शेतकर्यांने सांगीतले .