नांदेड , ( प्रतिनिधी )- मौजे अंबाडी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री विठ्ठलराव राजन्ना सिलमवार यांचे गावी अंबाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्यविधी अंबाडी ता. किनवट येथे आज रविवार दिनांक 25 एप्रिल 2021 रोजी दुपारी तीन वाजता कोव्हीड-१९ च्या सर्व नियमाचे पालन करून अंत्यविधी संपन्न झाले. श्री विठ्ठलराव सिलमवार यांना अस्थमाचा जुनाट त्रास होता ते काही दिवसापासून अन्न बंद केले होते.मृत्युसमयी ते ७५ वर्षाचे होते.श्री विठ्ठलराव सिलमवार हे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते होते त्यांनी भाजपच्या तालुका किसान आघाडीचे पदाधिकारी सोबतच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते.
स्वर्गीय विठ्ठलराव सिलमवार काकांची निधनाची बातमी समजताच किनवट माहूर विधानसभेचे आमदार भिमराव केराम साहेब यांनी सिलमवार परिवारावर कोसळलेल्या दुःखत प्रसंगी माझे संपूर्ण कुटुंब या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले ,नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, भाजपा नेते अशोक पाटील सूर्यवंशी,सुरेश रंगेनवार,बाबुराव पुजरवाड,प्रा. येरडलावार, प.स.मा उपसभापती आईटवार, पपुलवाड गुरुजी आदींनी शोक संदेश देवून आम्ही आपल्या दुःखात संपूर्ण परिवार सहभागी असल्याचे सांगत आपल्या भावना प्रकट केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधानदादा जाधव,मांडवी जिल्हा परिषद गणाचे सदस्य मधुकर राठोड, जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड,खासदार हेमंत पाटील यांचे यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड,भाजपचे संजू रेड्डी पळशीकर,तालुका कृषी अधिकारी श्री बालाजी मुंडे पत्रकार गोकुळ भवरे,शशिकांत लढे,सुभाष कयापाक,आनंदराव हलवले,शेदुपान मुनेश्वर,विलास कानिदे, सिसले यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी पोगुलवार,ग्रामविकास अधिकारी सिरसेवाड,ग्रामसेवक सटलावार,कृषि पर्यवेक्षक भालेवाड, कृषी सहायक कोटुलवार, पांडुरंग बैनवाड पोलीस जमादार बोंडलेवाड,पोलीस नाईक संदूपटलेवार,वैद्किय अधिकारी डॉ.व्यंकट आईटवार, डॉ.जाधव, डॉ सल्लावार,शुभम माडे,सुनिल बोलेनवार, किसन यासमवार, प्रा.नरेंद्र कोगुरवार,गुणाजी पडलवार,अनिल जिडेवार, संदुलवार सर,परमेश्वर मुराडवार,बावणे, पैडीपेलीवार यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी व विविध पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार बांधव आदींनी सिलमवार परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन श्री विठ्ठलराव सिलमवार यांना श्रद्धांजली अर्पण करून परिवारास धीर दिला.