Home विदर्भ पांढरकवडा व वणी वन विभागात मृत्यूसत्र सुरुच, आणखी एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू

पांढरकवडा व वणी वन विभागात मृत्यूसत्र सुरुच, आणखी एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू

1115

मुकूटबन : यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन परिक्षेत्राच्या मांगूर्ला रेंज मधील कक्ष क्रमांक ३० मध्ये एका वाघिणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे.

हीच ती मेलेली वाघिण

या वाघिणीचे पुढील दोन पंजे कापलेले होते. त्यामुळे या वाघिणीची शिकार झाल्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. मंगळवारीच ता. 20 ला यवतमाळच्या वणी तालुक्यात घोन्सा शेत शिवारामध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळला होता. गळ्यात तारांचा फास अडकल्याने या वाघीणीचा मृत्यू झाला होता. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच घोन्सा पासून 20 किमीच्या अंतरावर मांगूर्ला रेंज मधील कक्ष क्रमांक 30 मध्ये पुन्हा एका वाघीणीचा मृतदेह सापडला त्यामुळे वन संवर्धन व संरक्षणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पांढरकवडा वन विभाग अंतर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगूर्ला नियत क्षेत्र व कक्ष क्रमांक 30 मध्ये वाघ मृत झाल्याची माहिती ता. 25 ला मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने सुभाष पुरानिक विभागीय वन अधिकारी पांढरकवडा, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे मुकुटबन, प्रधान मुख्य वनसंरक्षक अधिकारी नागपूर यांचे प्रतिनिधी प्रकाश महाजन, मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी यांनी घटनास्थळी भेट दिली वस्तुस्थितीची पाहणी केली असता वाघीण नाल्याला लागुन असलेल्या गुहेत मृत अवस्थेत आढळून आली. गळ्याला तारेचा फास अडकल्याचे व अणकुचीदार धारदार हत्याराने मारल्याचे आणि गुहेच्या तोंडाशी आग लागल्या आग लावल्याचे जळलेल्या लाकडा वरून दिसून आले वाघिणीच्या पुढच्या पायाचे पंजे तोडून नेल्याचे दिसून आले पशुवैद्यकीय अधिकारी चेतन पातोंड, पेच व्याघ्र प्रकल्प नागपूर चे अरुण जाधव, डॉक्टर एस एस चव्हाण झरी, डॉक्टर डी जी जाधव मुकुटबन, डॉक्टर व्ही. सी. जागडे मारेगाव यांचे मार्फत घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण माहित पडेल सदर प्रकरणी प्राथमिक गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक वनसंरक्षक पांढरकवडा हे करीत आहे.

वन विभागाच्या लापरवाही मुळे शिकारी वाघिणीची शिकार करण्यात यशस्वी ही वाघीण गुहेमध्ये राहत होती याचा अर्थ ती गर्भवती असावी असा अंदाज आहे. गळ्याला तारेचा फास आढळून आला याचा अर्थ तीला शिकार करण्याच्या हेतूने गुहेच्या तोंडाजवळ तारेचा फास लावण्यात आला. गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जळलेल्या लाकडा वरून दिसून आले याचा अर्थ त्या वाघिणीला जाळून पुरावा नष्ट करायचा होता. ती गर्भवती वाघीण नाल्या जवळील गुफेत राहत होती तर तिथे कॅमेरे का लावण्यात आले नाही. कॅमेरे लावले असतील तर गर्भवती वाघीण ची कॅमेरे द्वारे दररोज तपासणी का केली गेली नाही. कॅमेरे लावले असतील तर आरोपी कॅमेऱ्यात कैद झाला असेलच. असे अनेक तर्क वितर्क निघत आहे. या वाघिणीकडे एकूणच वन विभागाचे दुर्लक्ष आहे. हे शिकाऱ्याला सुध्दा माहीत असावे म्हणूनच शिकारी वाघिणीची शिकार करण्यात यशस्वी झाला. वणी तालुक्यात घोन्सा शेत शिवारामध्ये वाघिणीचा मृत्यू व झरी जामणी तालुक्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील मांगूर्ला रेंज मधील कक्ष क्रमांक ३० मध्ये वाघिणीचा मृतदेह या दोन्ही घटनात शिकाऱ्याने ताराचा फास लावूनच शिकार केली याचा अर्थ दोन्ही घटनेचा आरोपी सुध्दा एकच असू शकतो.

13 वाघांच्या मृत्यूची नोंद
गेल्या तीन महिन्यांत राज्यात तब्बल 13 वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता ही चौदावी घटना आहे. यामुळे वन संवर्धन व संरक्षणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाघांचा संचार आहे. तरी वनविभागाची वाघा प्रती लापरवाही दिसून येत आहे.