घाटंजी :-वर्षभरापासून कोरोना या महाभयंकर विषाणू ने अख्य जग त्रस्त झाले आहे.या महामरीतुन बाहेर कसे पडायचं याचं विचाराने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे परंतु घाटंजी व
तालुक्यातील वाढत्या रुग्णांना पाहून जनतेमधील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणांना पुरेपूर साहित्य नसल्याने ते सुद्धा हलबत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.तालुक्यातील कोविडं सेंटर मधील परस्थिती स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान २ ते ४ दिवसांचा अवधी लागतो . या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नाही .घाटंजी तालुक्यांमध्ये रॅपीड अँन्टीजन टेस्ट कीट ही उपलब्ध नसल्याचे चित्र आहे . त्यामुळे तालुक्यातील रुग्णाच्या चाचण्या न झाल्याने , रुग्णाच्या संख्येत घट दिसून येते . खरे तर वस्तुस्थिती तशी नाही . करोना पॉझीटिव्ह आलेले ८५ टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणातून बरे होऊ शकतात . परंतु त्यासाठी आवश्यक औषधे सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे . मात्र , पॉझीटिव्ह रुग्णांना द्यावयाची साधी साधी औषधे ( Cetrizine , Zink , Azithromicin , Fabiflu .. ) सुध्दा शासकीय ‘ रुग्णालये / कोव्हीड केअर सेंटर येथे उपलब्ध नसतात . इथे रिपोर्ट यायला ४ दिवस लागतात तो रुग्ण इतर ठिकाणी फिरतो त्या नंतर ४ दिवसांनी त्याला कळत की रिपोर्ट positive आलेला आहे म्हणून. त्यामुळे रुग्णाची परिस्थिती खालावून त्यांना पुढील उपचार देणे ( ऑक्सीजन , रेमीडीसीवीर इंजेक्शन इत्यादी ) गरजेचे ठरते.तुम्ही स्वतः या मध्दे लक्ष घालून टेस्ट किट, ऑक्सिजन च पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अशी मागणी रितेश बोबडे(जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) यांनी केली आहे