Home विदर्भ धामणगांव रेल्वे येथे सावीञीबाई फुले जयंती साजरी

धामणगांव रेल्वे येथे सावीञीबाई फुले जयंती साजरी

138

बाबाराव इंगोले – झाडगांव

अमरावती / धामणगांव रेल्वे , दि. १९ :- बुद्धिस्ट सोसायटी अॉफ इंडीया शाखा धामणगांव रेल्वेच्या विद्यमाने क्रांती ज्योति सावीञीबाई फुले यांची जयंती धम्मोदय बुद्ध विहाराच्या प्रांगणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शिका उषाताई खंडारे शिक्षिका यवतमाळ यांनी”क्रांती ज्योति सावीञीबाई फुले यांच्या स्ञी मुक्ती लढा व वर्तमानातील स्ञी सुरक्षेची गरज”या विषयावर मार्गदर्शन केले तसेच त्यांची पुर्ण जीवन गाथा कथन केली.तर महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज अॉफ सोशल वर्क यवतमाळचे प्रा.दिपक आटे”आजच्या युवा पिढीला संस्कार व संस्कृतीची गरज यावर मार्गदर्शन केले.
धम्मपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख अध्यक्ष मा.राहुलजी गायकवाड सर तर उद्घाटक मा.विजय चोरपगार माजी अध्यक्ष अमरावती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.निरंजन धांदे,मा.ञ्यंबकराव ढोले उपस्थित होते.सावीञीबाई फुले जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्या निमित्याने पंधरा वर्षा खालील वयो गटातील मुला-मूलींनी माता रमाई,क्रांती ज्योति सावीञीबाई फुले,माता जिजाई,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छञपति शाहु महाराज,कर्मयोगी संत गाडगे महाराज इत्यादी महापुरुषांच्या वेषभूषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला गुडदे मॅडम,साखरे मॅडम व पाटील मॅडम पर्यवेषक होत्या,ह्या परीक्षेचा गुणानूक्रमे प्रथम बक्षिस उदय मनिष बागडे यांनी संत गाडगे महाराज यांची भूमिका साकारली होती त्यांना संस्थे कडून स्मृती चिन्ह व लक्ष्मणराव मेश्राम यांचे स्मृती प्रित्यर्थ कु.चंदा मेश्राम यांचे तर्फे बक्षिस देण्यात आले.द्वितीय बक्षिस साक्षी रंगारी हिने क्रांती ज्योति सावीञीबाई फुलेची भुमिका केली होती तिला ईश्वर ढाले यांचे स्मृती प्रित्यर्थ बेबीताई ढाले यांचे कडून बक्षिस दिले.कु.जागृती महेंद्र मेश्राम हिला चांगुनाबाई अचकापुरे यांचे स्मृती प्रित्यर्थ चंद्रमणी अचकापुरे यांचे कडून तृतीय बक्षिस देण्यात आले.वेषभूषा स्पर्धे मध्ये पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तर “भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म”ह्या ग्रंथावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेचा निकाल याच कार्यक्रमा दरम्यान जाहीर करण्यात आला.दहा ते अठरा वयो गटातील प्रथम क्रंमाक हर्षद संजय बन्सोड यांना दिवंगत मारोतराव बोरकर स्मृती प्रित्यर्थ यशवंत बोरकर यांनी बक्षिस दिले.द्वितीय बक्षिस कु.मैञी महेंद्र डोईफोडे हिला बळीरामजी हेंडवे यांचे स्मृती प्रित्यर्थ अशोकराव हेंडवे यांनी बक्षिस दिले.कु.श्रेया सुधीर साखरे हिला जानरावजी वानखडे स्मृती प्रित्यर्थ मुरलीधर वानखडे यांचे तर्फे तृतीय बक्षिस देण्यात आले.तसेच एकोणीस ते साठ वयो गटातील प्रथम पारीतोषिक करुणा मोहनराव मोहोड हिला वासुदेव मेश्राम स्मृती प्रित्यर्थ पुष्पाताई गुडदे यांनी दिले.द्वितीय बक्षिस संजीवनी राजेश चव्हाण हिला नामदेव हातेकर यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रमोद हातेकर यांनी दिले.तर सुनिता डोईफोडे हिला काशी दशरथ लोखंडे यांचे स्मृती प्रित्यर्थ तृतीय पारितोषिक विजय लोखंडे यांनी दिले.
ह्या कार्यक्रमाला यशस्वीते करीता शालीक कवाडे,रामदासजी हाडे,घनश्याम कोसे,मुरलीधर वानखडे,कु.सुरभी बोरकर,नंदिनी खोब्रागडे,रिया वाघमारे यांनी अथक परीश्रम घेतले.