रफीक कनोजे
झरी जामणी :- यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील मांगुर्ला येथे रवीवारी सकाळी गर्भवती वाघिणीची शिकार उघडकीस आली. या वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. त्या अनुषंगाने आज बुधवारी ता. 28 ला सकाळी आठ वाजता यवतमाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ व त्यांचे सोबत एलासिबी पथक यांनी मांगुर्ला येथे भेट देऊन वाघिणीची शिकार झाली तेथे जाऊन प्रत्यक्ष गुहेची पाहणी केली.
पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र. ३० मध्ये पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ, वन अधिकारी, एलासिबी पथक, मुकूटबन पोलीस, पाटण पोलीस अधिकारी यांनी वाघिणीच्या गुहेची पाहणी केली.त्यानंतर वन अधिकारी पांढरकवडा व मुकूटबन वन अधिकारी यांचे सोबत दोन तास चर्चा केली. 12 वाजता पोलीस अधीक्षक पांढरकवडा कडे रवाना झाले. मुकूटबन पोलीस ठाणे चे ठाणेदार धर्मा सोनुने, प्रवीण ताडकोकुलवार, एएसआय खुशाल सुरपाम व ईतर कर्मी हजर होते.
एका महिन्यात दोन वाघिणी ची हत्या…!
23 मार्च ला वणी तालुक्यातील घोंसा शेत शिवारात वाघिणी ची हत्या व झरी जामणी तालुक्यातील मांगुर्ला येथे 24 एप्रिल ला वाघिणीची हत्या करण्यात आली. त्यामुळे स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया या तालुक्यात सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
वाघीण गुहेत राहत होती म्हणून गर्भवती होती.
मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र. 30 मध्ये वाघिणीचा मृतदेह आढळून आला. याठिकाणी नाल्याला लागूनच एक गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती. त्यामुळे ती गर्भवती होती. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटे आहे.