मजहर शेख,
नांदेड/किनवट,दि : २९:- कोरोना विषाणु अणुषंगाने जर या बिकट परिस्थितीतुन आपल्याला लवकरात लवकर बाहेर यायचे असेल, अन पुर्वी सारखे सामान्य आयुष्य जगायचे असेल तर नागरीकांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसिकरण करुन घ्यावे असे आवाहन माजी आ.प्रदीप नाईक यांनी केले आहे.
माजी आ.प्रदीप नाईक यांनी एकापत्रकाव्दारे मतदारसंघातील नागरीकांना आवाहन केले आहे कि, कोरोना विषाणु प्रतिबंधक लस हि अत्यंत आवश्यक असुन केवळ आणी केवळ लसिकरनामुळेच आपण पुर्वपदावर येणार आहोत याशिवाय सध्याच्या स्थितीत दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
आजच्या स्थितीत रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळणे खुप अवघड झाले असुन त्यामुळे त्याचा काळाबाजार करण्यात येत आहे अशा स्थितीत ज्या व्यक्तीने लस घेतली आहे त्यास अशा कोणत्याही इंजेक्शन ची आवश्यकता पडत नाही अशा प्रकारचे रिपोर्टस येत आहे यामुळे अत्यंत सुरक्षित असलेली हि लस नागरीकांनी तातडीने घ्यावी जेणे करुन त्यांना कोरोनाची लागण जरी झाली तरी त्यात जास्त त्रास होणार नाही कारण एक लाख लस घेतलेल्या व्यक्ती मागे ४ ते ५ व्यक्तींना कोरोनाची लागण होत आहे त्यामुळे कोरोना विषाणुला थोपवण्याकरिता नागरीकांनी लसिकरण मोहीमेला प्रतिसाद देणे आत्यावश्यक झाले आहे.
तर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार, राष्ट्रपती, अनेक ख्यातनाम राजकारणी, क्रिकेटपटु, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी हि कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे तर मी स्वतः लसिकरणाचे दोन्ही टप्पे पार केले आहे असे ही माजी आ.प्रदीप नाईक यांनी सांगितले आहे.
तर किनवट माहुर मतदारसंघातील अनेक मान्यवरांनी या लसिकरण मोहिमेला प्रतिसाद दिला आहे यामध्ये आ.भिमराव केराम, भाजपा नेते अनिल तिरमनवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजप शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, हबिब चव्हाण, रा.कॉ चे गटनेते झहिरोद्दीन खान, माजी नगराध्यक्ष के. मुर्ती , प्रा.किशनराव किनवटकर, पत्रकार प्रदीप वाकोडीकर यांच्यासह तालुक्यातील ग्रामिण भागातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, नागरीक, विविध पक्षाचे पदाधिकारी व सुजान नागरीकांनी लसीकरण करुन घेतले आहे तर आता नागरीकांनी लसीकरण करुन घेण्याकडे जास्त लक्ष केंद्रीत करावे कारण ज्यांचे लसिकरण झाले आहे आणी लसिकरणाच्या २८ दिवसानंतर पुर्णपणे रोगप्रतिकारशक्ती तयार झालेल्या नागरीकांना तोंडाला मास्क लावण्याची आवश्यकता नाही ते जगात कोठेही प्रवास करु शकतील असे अमेरीका व इजराईल या देशाने त्यांच्या नागरीकांकरिता घोषीत केले आहे त्यामुळे जनजिवन पुर्वपदावर येऊन पुर्वीसारखे सामान्य जगायचे असेल तर नागरीकांनी लसीकरण करुन शासनाला सहकार्य करावे असे आवाहन सर्वस्थरावरुन करण्यात येत आहे.