वर्धा – फिर्यादी सौ. वंदना विनोद सातपुते रा. कान्हापुर ह्या दि.११-०४-२०२१ रोजी त्यांच्या शेजारच्या मैत्रीणी सोबत सकाळी फिरण्याकरिता नागपूर-वर्धा हायवे रोडने गेल्या होत्या त्या दरम्यान सकाळी ०६.१५ वा. चे सुमारास तिन अनोळखी इसमांनी एका पांढ-या रंगाचे मोपेड वाहनावर ट्रिपल सिट येवुन पुलगावला कोणता रोड जातो असे विचारून त्यांच्या गळयातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत कि. ३०,०००/- रू. ची जबरीने हिसकावुन पळुन गेले. फिर्यादीचे रिपोर्टवरून पो.स्टे. सेलु येथे अप. क्र. २०५/२०२१ कलम ३९२, ४११, ४१४, ३४ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याची तात्काळ दाखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले. आरोपी हे मौजा कान्हापुर येथुन नागपुर कडे गेल्याची माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलु ते बुटीबोरी व नागपुर मार्गे आरोपीतांचा मागोवा घेवुन त्यांचा नागपुर शहरामध्ये २ दिवस सातत्याने तपास करून सदर गुन्हयातील आरोपीतांना निष्पन्न केले व गोपनीय माहीतीच्या आधारे नियोजनबद्धरित्या सापळा रचुन दिनांक १४-०४-२०२१ रोजी ग्राम गाडेघाट येथील अम्मा का दर्गाह परिसरातुन आरोपी नामे १) मिक्खन उर्फ लखन नाथुलाल सोलंकी, वय १९ वर्ष, रा. गाडेघाट, कामठी, २) पप्पु शामलाल बुरडे, वय २१ वर्ष, रा. पाचपावली, नागपुर यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले होते. वर नमूद गुन्हयातील आरोपी असलेला त्यांचा तिसरा साथीदार आसीफ अली इम्तीयाज अली, रा. कामठी हा आरोपी फरार होता. दिनांक २८-०४-२०२१ रोजी गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली कि, सदर आरोपी हा कामठी येथे आहे. त्यावरून सापळा रचून सदर आरोपीस मोठ्या शिताफितीने ताब्यात घेतले. सदर आरोपी विरुद्ध नागपूर शहर येथे खून, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे. आरोपीस पुढील कारवाईस पोलीस स्टेशन सेलू यांचे ताब्यात देण्यात येत आहे. करिता माहितीस सादर
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. सौरभ घरडे, पोउपनि. गोपाल ढोले, पोलीस अंमलदार अशोक साबळे, सलाम कुरेशी, निरंजन वरभे, रणजीत काकडे, अविनाश बनसोड, नितीन मेश्राम सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.