Home नांदेड फुकट्या प्रवाशांचा फटका सर्वसामान्य नागरीकांना.

फुकट्या प्रवाशांचा फटका सर्वसामान्य नागरीकांना.

307

मजहर शेख

इंटरसिटी रेल्वेगाडी रद्द.

नांदेड/किनवट , दि :१:- फुकट्या प्रवाशांचा फटका सर्वसामान्य नागरीकांना बसला असुन आदिलाबाद ते नांदेड ते आदिलाबाद अशी धावणारी इंटरसिटी रेल्वेगाडी कमी प्रवासी संख्येच्या कारणामुळे ३१ मे २०२१ पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
किनवट, सारखणी, बोधडी, मांडवी, इस्लापुर, हिमायतनगर, शिवणी, जलधारा या परिसरातील व या आजुबाजुच्या गावातील नागरीकांना नांदेड येथिल प्रशासकीय व आरोग्य विषयक विविध कामानिमित्त ये-जा करण्याकरिता अत्यंत उपयुक्त असलेली ट्रेन नं ०७४०९ व ०७४१० आदिलाबाद ते नांदेड ते आदिलाबाद हि रेल्वे गाडी कमी प्रवासी संख्येचे कारण पुढे करत रद्द करण्यात आली आहे परंतु या गाडीला प्रचंड प्रवासी संख्या असतांना ते प्रवासी फुकट किंवा टी.सी सोबत हातमिळवणी करुन प्रवास करत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या रेकॉर्ड्वर प्रवासी संख्या नोंदवली गेली नसल्याने अशा फुकट्या व भ्रष्ट्राचारी नागरीकांच्या या अशा आचरणाचा फटका सर्वसामान्य नागरीक, रुग्ण, अबालवृध्द व शासकीय कर्मचा-यांना बसला आहे आता नांदेड ये-जा करण्यासाठी खाजगी वाहन व महामंडळाच्या बस वर अवलंबुन रहावे लागणार आहे जे कि खुप त्रासदायक व आर्थिक दृष्ट्या खर्चिक होणार आहे त्यामुळे नागरीकांनी आबां गोड लागला तर तो मुळा सकट उपडुन खाऊ नये या म्हणीचा प्रत्यय आता येणार आहे.
तरी या रेल्वेगाडीला सुरु करण्याकरिता खा.हेमंत पाटील, आदिलाबादचे खा.सोयम बापुराव, आ.भिमराव केराम, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ता. अध्यक्ष प्रकाश राठोड व किनवट शहरातील विविध वृत्तपत्राकरीता वृत्तलेखनाचे काम करणारे पत्रकार यांनी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी वेळोवेळी त्यांच्या प्रसिध्दीत केला आहे आता परत हि गाडी सुरु करण्याकरिता कोण पुढाकार घेतो या कडे तालुक्यातील सर्व सामान्य नागरीकांचे लक्ष लागले आहे.