देवानंद जाधव ( वि. प्र. )
यवतमाळ – आर्णी पंचायत समिती अंतर्गत विविध गावात अपहाराचे असंख्य प्रकरण ऊजेडात येत आहे.
महाळुंगी ग्राम पंचायत मध्ये तर मग्रारोहयो च्या कामाची पुरती वाट लागली आहे. नाला सरळीकरण, सिमेंट नाला, सिमेंट नाली, ऊघडी गटारे, या कामा व्यतिरिक्त अनेक कामे थातुरमातुर पणे करुन, बोगस मजुरांच्या नावे लाखोंची रक्कम हडपली आहे. सबंधीत ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांनी, बोगस अकुशल मजुरांच्या बोगस नोंदी नमुना क्रमांक चार रजिस्टर वर घेऊन,मजुरांच्या खोट्या सह्या करुन, विविध बॅंकेतुन लाखो रुपयांची बिले काढली आहेत. या कामात ग्राम पंचायत कर्मचा-यांनी टक्का खिशात घालुन, ठेकेदारांना तनमणे धनाने मदत करुन शासनाची तिजोरी रिकामी केली आहे.तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सर्वदुर अशीच अवस्था आहे. जिथे चोरांची भिती तिथे, अंधार पडावा असे वातावरण आहे. महाळुंगी हे गाव पं.स.चे माजी सभापती यांचे असल्याने, या गावात कागदोपत्री कोट्यवधी रुपयांची कामे दाखविण्यात आली. तत्कालीन सभापतींना अंधारात ठेऊन लुटारुंच्या टोळक्यांनी शासनाच्या संपत्तीवर हात साफ केले. ग्रामसेवक, रोजगार सेवक मालामाल झाले. या अनितीच्या मार्गाने कमावलेल्या धनाचे मध्यवर्ती कनेक्शन आहे. बॅंकेतील बोगस मजुरांच्या नावे ऊचललेल्या रकमेची आणि मजुरांच्या नावाची सखोल चौकशी केल्यास, भ्रष्टाचार करणा-यांच्या पापाचे पितळ ऊघडे पडणार आहे. या संदर्भात अनिल नाईक यांनी केलेल्या तक्रारीचा प्रवास सध्या आर्णि, यवतमाळ, अमरावती, मुंबई असा चालु आहे. दोषीवर कडक कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा ईशारा अनिल नाईक यांनी दिला आहे. तुर्त जिल्हाधीकारी काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. पण .महाळुंगी ग्राम पंचायत मध्ये नमुना क्रमांक चार रजिस्टर मध्ये बोगस मजुरांच्या बोगस सह्या करुन लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहे हे सत्य आहे.