लॉकडाऊनमध्ये दुकान उघडल्याने छायाचित्र काढल्याने व्यापार्याचा तीळपापड बाजारपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद भल्या पहाटे दुकाने उघडणार्यांवर पालिकेने कारवाई करण्याची अपेक्षा
रावेर (शरीफ शेख)
कोरोनामुळे शासनाकडून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी असतानाही काही व्यापारी मात्र दुकाने सुरू ठेवत असून त्यामुळे मात्र कोरोनाचा स्प्रेड वाढण्याची भीती वाढली आहे. या संदर्भात काही दैनिकांचे छायाचित्रकार दैनिकांसाठी छायाचित्र काढण्यासाठी रविवारी मार्केटमध्ये गेले असता एका व्यापार्यासह अन्य दोन अनोळखींनी छायाचित्रकारांना शिवीगाळ करून दमदाटी केली असत्याचा संतापजनक प्रकार घडला. या संदर्भात व्यापार्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.
फोटो काढल्यानंतर व्यापार्याकडून धमकी पोलिसात गुन्हा..!
या संदर्भात छायाचित्रकार हबीब चव्हाण यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. रविवारी सकाळी 9.30 वाजता शहरात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे पालन होत आहे वा नाही हे पाहण्यासाठी अन्य छायाचित्रकारांसह फिरत असताना मुख्य आठवडे बाजारातील छबीलदास चौधरी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावरील जनता मॅचिंग सेंटर हे दुकान उघडे असल्याने फोटो काढत असताना दुकान मालक आठवाणी हे बाहेर आले व त्यांच्या परीचीत असलेले दोन लोक आले व त्यांनी कॅमेर्याच्या दिशेने धावून छायाचित्रकारांना शिवीगाळ केली तसेच परत असे केल्यास पाहून घेण्याची व जीवे ठार माण्याची धमकी दिली. ही घटना घडली तेव्हा छायाचित्रकार कमलेश चौधरी, पत्रकार निलेश फिरके, इम्तीयाज मेहमूद कासीम व सतीश कांबळे उपस्थित असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
व्यापार्याला सुनावला दंड
नॉन इसेन्शीयल दुकानांना लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी नाही याबाबत शासन निर्देश व जिल्हाधिकार्यांचे आदेश नसल्याने पालिका पथकाने या संदर्भात जनता मॅचिंग सेंटरचे आठवाणी यांना दोन हजारांचा दंड सुनावून तो वसुल केला.
भल्या पहाटे दुकाने सुरू ठेवणार्यांवर हवी कारवाई
कोरोना स्प्रेड वाढत असल्याने व तो नियंत्रीत होण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे मात्र शहरातील काही व्यापारी नॉन इसेन्शीयल दुकानांना परवानगी नसतानाही भल्या पहाटे पाच ते सकाळी 11 दरम्यान दुकाने उघडत आहेत शिवाय कारवाई टाळण्यासाठी दुकानाला बाहेरून शटर वा कुलूप लावत असल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व पोलिस प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेवून संबंधितावर गुन्हे दाखल करून दंड वसुल करण्याची अपेक्षा आहे. शहरातील डिस्को टॉवर परीसर, अप्सरा चौक परीसर, छबीलदास चौधरी कपडा व्यापारी संकुल, मॉडर्न रोड, गांधी चौक या भागात पालिका व पोलिस पथकाने पहाटेपासून गस्त वाढवून धडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कठोर कारवाई करणार ः मुख्याधिकार
नॉन इसेन्शीयल दुकानांना परवानगी नाही त्यामुळे अशी दुकाने उघडणार्या दुकानांवर निश्चित कठोर कारवाई होईल. छायाचित्रकारांना दमदाटी होण्याची बाब निश्चित चुकीची असल्याचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार म्हणाले.