धुळे , दि. १९ :- तालुक्यातील फागणे गाव येथील छोटा बंधारा याठिकाणी प्रशासनाची दिशाभूल करून वाळू माफियांनी सर्रासपणे आपला काळाबाजार आहे.
याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असून ग्रामपंचायत प्रशासन देखील डोळे झाकणी पणा करून या माफियांना पाठबळ देण्याचे काम करत आहे.
आज आमचे आवाज टीव्ही चे पत्रकार वृत्तसंपादक माननीय चे दीपक वाघ यांनी याबाबत विचारणा केली असता या घटनास्थळी उत्खनन माफियांकडून दीपक वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की करून अरेरावी करण्यात आली तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या.
सदर अवैध उत्खनन माफिया कैलास आहिरे यांच्यासह काही ही त्यांच्या उत्खनन माफियांनी दीपक वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांना अरेरावी केली तसेच घटनास्थळी त्यांचा कॅमेरा देखील हातून हिसकावून घेण्यात आला.
या बाबत जिल्हा प्रशासनाने व तहसील प्रशासनाने या अवैध व्यवसाय करणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करावा अन्यथा सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाला घेराव घालण्यात येईल.
लवकरात लवकर या कामाची चौकशी करावी व धमक्या देणाऱ्या या माफियांना पोलिसांनी खाकी दाखवावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने होत आहे.