प्रतिनिधी – रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:-माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओबीसी नेते आहेत त्याच्यावर अपशब्द वापरताना भान राखून बोलावे अन्यथा ओबीसी समाज शांत बसणार नाही असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी दिला
ओबीसी नेते माननीय नामदार भुजबळ साहेबांना चुकीचा व खोटा आरोप करून ओबीसी चा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला व आता माननीय नामदार भुजबळ साहेबांनी पश्चिम बंगालची सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला तर परत त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटला कडून होत आहे तरी त्यांनी भुजबळ साहेबांबद्दल काही अपशब्द वापरू नये अन्यथा महाराष्ट्रातील समता सैनिक शांत बसणार नाही व त्यांना महाराष्ट्राचे रस्त्यावर फिरणेही मुश्किल करू.