Home नांदेड देगलूर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राजकीय फवारण्यांना वेग” शिवसेनेचे माजी आमदारांचे तिकिटासाठी पक्षावर दबावतंत्र,...

देगलूर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राजकीय फवारण्यांना वेग” शिवसेनेचे माजी आमदारांचे तिकिटासाठी पक्षावर दबावतंत्र, भाजपच्या वाटेवर ?

726

राजेश एन भांगे

 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळं महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता असतानाच, आता नांदेडमध्ये सत्ताधारी आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर आगामी पोटनिवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी हे दबावतंत्र सुरू केल्याचं समजतं.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून तिन्ही पक्षातील असंतुष्टांना सामावून घेणे ही महाआघाडीसाठी डोकेदुखी बनली आहे. पंढरपूरच्या निवडणुकीत याचाच अनुभव आला होता.
उमेदवारी कोणाला द्यायची यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत खल सुरू होता.
नांदेड जिल्ह्यात देगलूर मध्येही आता याचाच अनुभव येत आहे. देगलूर विधानसभेचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
त्यासाठी महाआघाडीमध्ये राजकीय खलबतं सुरू झाली आहेत.

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
पोटनिवडणुकीचे तिकीट आपल्यालाच मिळावे असा आग्रह त्यांनी धरला आहे.

त्यासाठी प्रसंगी भाजपमध्ये जाण्याचा पवित्राही त्यांनी घेतला असल्याचे चर्चा आहे.

देगलूर मध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी,
असा इशाराच त्यांनी दिलाय त्यामुळं महाआघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

शिवसेनेचा भाजपवर नेम
साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते असून ते याआधी दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.
मागील निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

आता पुन्हा एकदा साबणे निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.
ते जर भाजप मध्ये गेल्यास नांदेडमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होण्याची नाकारता येत नाही.

मा.आमदार सुभाष साबणे यांचं म्हणणं काय.

‘देगलूरमध्ये एका दुर्दैवी परिस्थितीत पोटनिवडणूक होत आहे.
या आधी शिवसेना व काँग्रेसनं स्वतंत्रपणे लढली होती.
कदाचित भविष्यातही लढली जाईल.
महाविकास आघाडी ही पोटनिवडणूक लढणार आहे.
या जागेसाठी मी शिवसेना पक्षप्रमुखांकडं उमेदवारी मागणार आहे.
पालघरमध्ये जसं झालं, त्याच धर्तीवर शिवसेनेनं ही जागा काँग्रेसकडून घ्यावी, असं मला वाटतं.
मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे व पक्षाच्या आदेशाला बांधील आहे.
पण पंढरपूरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
मागील काही दिवसांत मी मुंबईला गेलो नाही.

तसेच भाजपच्या कुठल्याही नेत्याला भेटलेलो नाही.
फक्त ही जागा महाविकास आघाडीनंच जिंकावी असं मला वाटतं,’ अशी भूमिका सुभाष साबणे यांनी यावेळी मांडली आहे.