Home जळगाव रावेर येथील ६ वर्षीय चिमुकली ईकरा फातेमा ने ठेवला पहिला उपवास (रोज़ा)

रावेर येथील ६ वर्षीय चिमुकली ईकरा फातेमा ने ठेवला पहिला उपवास (रोज़ा)

528

रावेर (शरीफ शेख)

मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो.या महिन्यात सर्व मुस्लिम मंडळी रमजान चे उपवास म्हणजेच रोज ठेवत असतात. परंतु इतक्या उन्हाळ्यात ४३ ते ४४ अंश तापमान असतांना उपवास पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण करून रावेर येथील खाटीक वाडा रहिवासी ईकरा फातेमा मोहम्मद इमरान खाटीक (वय ६ ) हीने तेवीस रमजानचा रोज़ा आपल्या जीवनातला पहिला रोज़ा ठेवला.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ४.३० वाजेपासून ते सायंकाळी ६.५९ वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने (अल्लाह) ईश्वर प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह ला या मुलीने साकडे घातले.
एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.